गणितीय कोडी सोडवा आणि आपल्या तर्क बुद्धीचा अधिकाधिक विकास करा. शाळेत विद्यार्थी अनेक विषय शिकतो. त्यातील विज्ञान व गणित हे दोन अ...
गणितीय कोडी सोडवा आणि आपल्या तर्क बुद्धीचा अधिकाधिक विकास करा.
शाळेत विद्यार्थी अनेक विषय शिकतो. त्यातील विज्ञान व गणित हे दोन असे आहेत की, ज्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर एक समान सूत्र आहे. भाषा दर प्रांतागणिक बदलते. इतिहास प्रत्येक राष्ट्राचा वेगळा, इतिहासातील प्रेरणास्थाने वेगळी. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांमध्येही ठिकाणानुसार फरक पडू शकतो. विज्ञान आणि गणितात मात्र चिरकालीन सत्ये शिकवण्याला प्राधान्य असते. विज्ञानापेक्षाही गणितात हे अधिक खरे आहे.
गणित हे तर्कबुद्धी तल्लख करण्यासाठी एक साधन आहे. रोजच्या जीवनात अनेकदा काही प्रमाणात तर्कबुद्धी आपण वापरतच असतो. त्या तर्कबुद्धीचा अधिकाधिक विकास करणे हे मानवाच्या विकासासाठी आवश्यक आहे आणि निदान काहीजणांनी तरी तो साधला पाहिजे, असे म्हणण्यात चूक नाही. यासाठी गणित, ज्यात शुद्ध तर्क ओतप्रोत भरलेला असतो, तो शिकायला व शिकवायला हरकत नसावी. गणितामुळे अमूर्त विचार करण्याची सवय होते हेही एक कारण आहे.
COMMENTS