१५ जूनपासून शाळा सुरु - जेथे एकही रुग्ण नाही ( School Start From 15 June 2020)
महाराष्ट्रातील ज्या भागात एकही कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही, तसेच ज्या भागात कॉरंटाईन सेंटर नाही अशा भागात येत्या 15 जून पासून शाळा सुरू करण्यात येणार आहे. - शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अनेक तज्ञांशी चर्चा केल्यानंतर 15 जूनला ज्या भागात कोरोना रुग्ण नाही, तसेच ज्या भागात कॉरंटाईन सेंटर नाही अशा भागात शाळा सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये शाळा सुरू करणे, विद्यार्थी सुरक्षितता, शैक्षणिक सातत्य या बाबींवर चर्चा करण्यासाठी मी आज काही प्रातिनिधिक तज्ज्ञांशी व विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी VC द्वारे चर्चा केली.@CMOMaharashtra @bb_thorat #schoolsreopening @AjitPawarSpeaks @INCIndia pic.twitter.com/ovyHOPcs4N— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) May 23, 2020
रेड झोन मध्ये एकही शाळा सुरु होणार नाही या झोन मधील विद्यार्थ्यांसाठी 15 जून पासून ऑनलाइन शिक्षण सुरू केले जाईल.
ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत जेव्हा विचारले असता त्यांनी सांगितले की ऑनलाईन शिक्षण हा पर्याय सर्वच ठिकाणी अंमलात आणता येणार नाही. आदिवासी पाडे, डोंगराळ भाग, गावखेडी येथे नेटवर्क चालण्याची गंभीर समस्या आहे. अशा ठिकाणी ऑनलाइन शिक्षण होणार नाही.
त्याचबरोबर ग्रामीण भागात आणि शहरी भागातील सर्व विद्यार्थ्याकडे मोबाईल असतोच असे नाही. अँड्रॉइड मोबाईल नसेल तर ऑनलाइन शिक्षण होऊच शकत नाही मात्र या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहणे आवश्यक आहे या दृष्टीने 15 जून पासून विशेष भागातील हळूहळू शाळांचे वर्ग सुरू करून त्या अनुभवाच्या आधारावर सुधारणा करीत सप्टेंबर, ऑक्टोबर पर्यंत सर्व शाळा सुरू करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, जेथे शाळा सुरू होणार आहे. तेथे आम्ही आरोग्याच्या दृष्टीने नियमावली तयार करीत आहोत. सुरक्षित अंतर पाळणे, हात धुण्याची व्यवस्था. उपस्थितीचे नियम पूर्ण शिथिल करणे, विद्यार्थ्यांचे छोटे गट करून एका गटाला दोन वा तीन तास शिकविणे असे मार्गदर्शन करणारी नियमावली तयार होत असून लवकरच आम्ही ही नियमावली जाहीर करू.
ज्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत त्या शाळेमधील विद्यार्थी आणि शिक्षकांचे आरोग्याला प्राधान्य देऊन त्यांच्यासाठी विशेष नियमावली लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तसेच खाजगी शाळा बाबतही काटेकोर नियम घालण्यात येणार असून रेड झोन मधील शाळा सुरू न करता ऑनलाईन शिक्षण देणेच बंधनकारक राहील.
Tag
#school starting date,#school start times,#school start news,#school startup,#school start 2020,#school starting in july,#school start date,#school start date 2020,#school bus cold start,
#good start school,#how to start school,#school kab se start hoga,#start high school,#school start karne ka tarika,#school kab se start hogi,#school start lockdown,#school start later
If you have any doubts, please let be know.