शैक्षणिक दिनदर्शिका ( प्राथमिक व माध्यमिक ) जून ते ऑगस्ट 2020

1 Mr. Annasaheb Babar

शैक्षणिक दिनदर्शिका  ( प्राथमिक व माध्यमिक )  जून ते ऑगस्ट


Educational Calendar (Primary and Secondary) June to August 2020

  नमस्कार विद्यार्थी मित्रहो ,

सध्या covid-19 या रोगामुळे संपूर्ण जग विविध समस्यांना सामोरे जात आहे. त्याला शिक्षण क्षेत्रही अपवाद नाही. जगभरातील शाळा-महाविद्यालये अनिश्चित काळासाठी बंद आहेत. शिक्षक, विद्यार्थी, पालक हे सर्वजण शाळा कधी सुरू होणार या विचारात आहेत. शाळा सुरू करता येत नसल्या तरी शिकणे जास्तीत जास्त समृद्ध करता येऊ शकेल का याचा विचार शासन पातळीवरही होत आहे.

शैक्षणिक दिनदर्शिका विद्यार्थ्यांनी, पालक आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वापरावयाचे आहे. तसेच शिक्षकांनी फोन कॉल व्हाट्सअप या माध्यमातून विद्यार्थी आणि पालक यांच्या संपर्कात राहून शैक्षणिक दिनदर्शिकेच्या साह्याने मुलांचे शिक्षण आनंददायी कसे होईल यासाठी प्रयत्न करावयाचा आहे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक दिनदर्शिकेचा चा वापर करत असताना पालक आणि घरातील इतर वडीलधारी मंडळी, तसेच मोठे बहिण भाऊ यांच्या देखरेखीखाली अध्ययन साहित्य वापरावे. शैक्षणिक दिनदर्शिकेमध्ये अध्ययन स्त्रोत म्हणून दीक्षा ॲप वरील संबंधित घटकाचे ई- साहित्य दिले आहे. या साहित्याचा वापर संदर्भ म्हणून करण्यापूर्वी शिक्षकांशी चर्चा करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे शिक्षकांच्या सूचनेनुसार पाठ्यपुस्तकांचा ही वापर आवश्यक आहे.

सर्व वर्गांची एकत्रीत दिनदर्शिका डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा .
 Educational Dindarshika

तरी खालील इयत्ता प्रमाणे आपापल्या वर्गाची दिनदर्शिका डाऊनलोड करावे व त्यातील दिलेल्या लिंक नुसार दीक्षा ॲप वरील व्हिडिओ व शैक्षणिक साहित्य पहावे.

 
अ.क्र.
इयत्ता
Download
1
   पहिली
 1
2
दुसरी
 2
3
तिसरी
 3
4
चौथी
 4
5
पाचवी
 5
6
सहावी
 6
7
सातवी
 7
8
आठवी
 8
9
नववी
 9
10
दहावी
 10

     दीक्षा ऍप मध्ये  online study उपलब्ध आहे.   ऑनलाईन अभ्यास व उपक्रम यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.




               तरी वरील दिनदर्शिकेच्या सहाय्याने अभ्यास चालू ठेवा.


टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

If you have any doubts, please let be know.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close