इयत्ता-11वी केंद्रिय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 2020-21 | Class-11 Central Online Admission Process 2020-21
![]() |
| 11th Admission |
१) मुंबई महानगर क्षेत्र (MMR)
२) पुणे, पिंपरी-चिंचवड मनपा
३) नागपूर महानगरपालिका
४) अमरावती महानगरपालिका
५) नाशिक महानगरपालिका
६) औरंगाबाद महानगरपालिका
प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक
कार्यवाहीचा तपशील
1) दि. 12/08/2020, 00:05 ते ) दि. 22/08/2020, 23:00 पर्यंत
प्रवेश अर्ज
भाग-2 (पसंतीक्रम नोंदविणे) आणि कोटा प्रवेशासाठी शून्य फरी
1) नियमित फेरी-1 साठी
विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम नोंदविणे (भाग-2 भरणे) सुरु.
2) या कालावधीत नवीन
विद्यार्थी प्रवेश अर्जाचा भाग-1 व भाग-2 भरु शकतात,
3) विद्यार्थ्यांचे
अर्ज verification मार्गदर्शन केंद्र व माध्यमिक शाळांध्ये सुरु
राहील.
4) कोटांतर्गत प्रवेश
करणे- व्यवस्थापन, इनहाऊस व अल्पसंख्याक कोटा (शून्य फेरी)
5) व्यवस्थापन तसेच
इनहाऊस कोटा प्रवेशाच्या रिक्त जागा प्रत्यार्पित करणे.
6) नियमित फेरी-1 साठी
प्रवेश अर्ज भाग-2 भरणे बंद होईल.
टीप:-
·
कोटांतर्गत
प्रवेशासाठी विद्यार्थ्याने प्रवेश अर्जाचा भाग-1 व भाग-2 भरणे आवश्यक आहे.
(विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची प्रिंट काढून ठेवावी).
·
कोटा
अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी अर्जाची स्कॅन कॉपी संबंधित उच्च
माध्यमिक विद्यालयास त्यांनी सांगीतलेल्या पद्धतीने ऑनलाईन पाठविणे.
·
संबंधित
उच्च माध्यमिक विद्यालयांनी विविध कोटांतर्गत आलेल्या अर्जानुसार विहित पद्धतीने
गुणवत्ता याद्या प्रसिद्ध करणे व त्यानुसार विद्यार्थ्यांचे कोटा प्रवेश ऑनलाईन
निश्चित करणे,
·
कोटांतर्गत
प्रवेशासाठी जाहिर केलेल्या गुणवत्ता यादीनुसार विद्यार्थ्यांनी स्वत:चा प्रवेश
निश्चित करणे आणि संबंधित उच्च माध्यमिक शाळांनी सकेंतस्थळावर झालेले प्रवेश
नोदविणे.
नियमित
प्रवेश फेरी-1
2) दि. 23/08/2020, 12:00
ते ) दि. 25/08/2020, 17:00 पर्यंत
1) तात्पुरती संभाव्य
सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहिर करणे. (सर्व पात्र विद्यार्थ्यांचा समावेश)
2) तात्पुरत्या
गुणवत्ता यादीवर आक्षेप/हरकती विद्यार्थी लॉगीन मध्ये "Grievance Redressal Module" द्वारे ऑनलाईन नोंदविणे.
3) ऑनलाईन प्राप्त
झालेल्या आक्षेप/ सूचनांचे संकलन करुन सर्वसाधारण गुणवत्ता यादी अंतिम करणेसाठी
संबंधित शिक्षण उपसंचालक यांनी आवश्यक कार्यवाही करणे.
3) दि. 30/08/2020, 15:00 वाजता
1) नियमित प्रवेश
फेरी-1 अंतर्गत प्रवेशासाठी गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे.
2) विद्यार्थी लॉगीन
मध्ये त्याला प्रवेशासाठी मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय दर्शविणे,
3) संबंधित उच्च
माध्यमिक विद्यालयास प्रवेशासाठी मिळालेल्या विद्यार्थ्यांची यादी कॉलेज लॉगीन
मध्ये दर्शविणे,
4) विद्यार्थ्यांना
याबाबत मोबाईल संदेश पाठविणे,
5) पहिल्या नियमित
फेरीचे कट-ऑफ संकेतस्थळावर दर्शविणे.
4) दि. 31/08/2020, 10:00
ते ) दि. 03/09/2020, 17:00 पर्यंत
1) विद्यार्थ्याने (Proceed For Admission) करुन मिळालेल्या उच्च माध्यमिक शाळेमध्ये ऑनलाईन प्रवेश निश्चित
करणे.
2) प्रवेश घ्यावयाचा
नसल्यास (Proceed For Admission)
करु नये. तसेच घेतलेला प्रवेश
रद्द करता येणे.
3) व्यवस्थापन व
अल्पसंख्याक कोटा प्रवेश सुरु राहतील.
4) व्यवस्थापन कोटा
अंतर्गत रिक्त जागा प्रत्यार्पित करणे,
टीप:-
·
पहिला
पसंतीक्रम ळाला असल्यास विद्यार्थ्यांने निवडलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात
प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
·
जर
प्रथम पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही अथवा नाकारला तर अशा विद्यार्थ्यांना
पुढील नियमित फेऱ्यांमध्ये संधी दिली जाणार नाही. त्यांना विशेष फेरीपर्यंत
थांबावे लागेल.
·
जर
विद्यार्थ्यास घेतलेला प्रवेश रद्द करावयाचा असल्यास तशी विनंती संबंधित उच्च
माध्यमिक विद्यालयास करावी आणि आपला प्रवेश रद्द करुन घ्यावा,
·
घेतलेला
प्रवेश रद्द केलेल्या विद्यार्थ्यांची नावे पुढील नियमित फेऱ्यांसाठी प्रतिबंधित
करण्यात येतील. अशा
·
विद्यार्थ्यांना
विशेष फेरीपर्यंत थांबावे लागेल.
5) दि. 03/09/2020, 17:00
ते ) दि. 03/09/2020, 20:00 पर्यंत
·
झालेले
प्रवेश संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदविणेसाठी उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी अतिरिक्त
वेळ.
सूचना-
1. ज्या
विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला आहे व त्यांनी आपला प्रवेश (केंद्रिय प्रवेश
प्रक्रियेतून अथवा कोटा प्रवेशाद्वारे) निश्चित केलेला आहे, अशा
विद्यार्थ्यांचे अर्ज पुढील फेन्यांसाठी बाजूला केले जातील.
2. उचच माध्यमिक
विद्यालयांना त्यांचेकडील कोटांतर्गत रिक्त जागा प्रत्याप्रित् करण्यासाठी
वेळापत्रकानुसार संधी दिली जाईल तसेच त्याबाबत वेळोवेळी सूचना दिल्याजातील.
यापूढील फेऱ्यांचे
वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल.
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group
2) Telegram Channel
3) Facebook Page


If you have any doubts, please let be know.