शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १६१) | Online Study 161
दि.. २१ सप्टेंबर २०२० वार -सोमवार
नमस्कार विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री मा.ना.वर्षा गायकवाड यांच्या
प्रेरणेने राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद,
महाराष्ट्र, पुणे आपल्या अभ्यासासाठी विविध
मार्गांचा अवलंब करत आहे.
यातील DIKSHA
सोबत
अभ्यासाचा हा एक प्रयत्न ...
DIKSHA
अँप
लिंक
विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो,
इंस्पायर अवॉर्ड मानक हा भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारा
व नॅशनल इनोवेशन फाउंडेशन ऑफ इंडिया संचालित कार्यक्रम आहे. त्याचा मुख्य उद्देश
किशोरावस्थेतील ( वर्ग 6 वी ते 10वी म्हणजे वय वर्ष 10 ते 15 वर्ष ) प्रतिभावंत
विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून त्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे हा आहे. या
कार्यक्रमामध्ये देशभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था द्वारा संचलित शासनमान्य
विद्यालये,
सरकारी
विद्यालयातील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. तरी आपण आपला सहभाग नोंदवावा. याकरीता
भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या वेब पोर्टल E- MIAS च्या वेबसाईटला http://www.inspireawards-dst.gov.in/ भेट द्यावी आणि आपल्या शाळेस
नामांकन भरण्यास सांगावे. नामांकन पाठविण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे.
तरी आपण सर्वांनी inspird
award स्पर्धेत भाग घ्यावा. अधिक
माहितीसाठी खालील व्हिडीओ पाहावा.
आजचा विषय - मराठी
इयत्ता - पहिली
पाठ - आला पाऊस आला
इयत्ता - दुसरी
पाठ - भेळ
इयत्ता - तिसरी
पाठ - आमचा शब्दकोश
इयत्ता - चौथी
पाठ - मुलाखत घेणे
इयत्ता - पाचवी
पाठ - सण एक दिन
इयत्ता - सहावी
पाठ - आपली सुरक्षा आपले उपाय
इयत्ता - सातवी
पाठ - नात्याबाहेरचं नात- भाषा सौंदर्य
इयत्ता - आठवी
पाठ - अन्नजाल
इयत्ता- नववी
पाठ - महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळुनी
इयत्ता - दहावी
पाठ - गोष्ट अरुणिमाची
उपक्रम १२१
आज आंतरराष्ट्रीय शांतता दिवस. तरी यानिमित्ताने सामाजिक सलोखा आणि स्वास्थ
म्हणजे काय आणि सामाजिक शांतता राखण्याचे कोणते किमान १० फायदे आहेत याबद्दल आपले
पालक / मोठ्या व्यक्ती / शिक्षक यांच्याकडून माहिती मिळवा. सामाजिक शांतता
प्रस्थापित करण्यासाठी तुम्ही तुमच्या पातळीवर काय करू शकता यावर विचार करा.
उपक्रम १२२
आज जागतिक अल्झायमर दिवस (Alzheimer). अल्झायमर म्हणजे
असा एक आजार ज्यामध्ये व्यक्तीची स्मृती कमी होत जाते. तरी अल्झायमर विषयी आपल्या
शिक्षकांकडून अधिक माहिती मिळवा. स्मृतीचा एखाद्या व्यक्तीला काय फायदा होतो आणि
स्मृती गेल्याने काय नुकसान होऊ शकते याबद्दल विचार करा.
शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी मित्र - मैत्रिणींनो, गेले १५० दिवसांपेक्षा अधिक
कालावधीपासून अभ्यासमाला अविरतपणे चालू आहे. तरी या १५० दिवसांमध्ये आपणास /
आपल्या विद्यार्थ्याना अभ्यासमाला कशी वाटली हे जाणून घेण्यासाठी हा फॉर्म भरून
घेत आहोत. कृपया विनंती आहे की, मोकळेपणाने
आपला अभिप्राय नोंदवावा.
https://forms.gle/3EhAXVrR78LACbkr6
Stay
home, stay safe!
आपला
दिनकर पाटील,
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
मागील अभ्यासमाला शाळा बंद..पण शिक्षण आहे (अभ्यासमाला- १60) | Online Study 160
**********************************************************************
If you have any doubts, please let be know.