शाळा दिवाळीनंतरच सुरु होणार - राज्य सरकारचा निर्णय
* सुट्टीनंतर
दुसऱ्या सत्रात भरणार वर्ग...
- शाळा सुरु करण्याच्या संदर्भात बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात दिवाळीच्या सुट्टीनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे .
- तसेच गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या ऑनलाइन शिक्षणाचा आढावा घेण्याचीही निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्षण विभागाला दिले आहेत.
- केंद्र सरकारने 15 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करण्यात परवानगी दिली आहे तथापि कोरोना प्रादुर्भाव असलेल्या भागात शाळा सुरु करणे अवघड असल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितले.
- दिवाळी सुटीनंतर दुसऱ्या सत्रात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
- केंद्र सरकारनेही 15 ऑक्टोबर ची सक्ती केलेली नव्हती उलट पालकांची सल्लामसलत करून आणि कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याचा मुहूर्त काढण्याचा सल्ला केंद्राने दिला होता. त्यामुळे केंद्राने काढलेल्या मुहूर्ताच्या पुढे जाऊन आणखी एक महिना घेत राज्य सरकारने शाळांसाठी दिवाळीनंतर चा मुहूर्त काढला आहे.
*******************************************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group
2) Telegram Channel
3) Facebook Page
If you have any doubts, please let be know.