दहावी व बारावीच्या प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा आता होणार लेखी परीक्षेनंतर | Practical and oral examinations of 10th and 12th will be held after written examination
सध्या
राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच काही
जिल्ह्यांनी अगोदरच लॉकडाऊन केले असून इतर जिल्हे सुद्धा आता लॉकडाऊन ची तयारी करत
आहे. त्यामुळे आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक
परीक्षा घेणे कठीण झाले आहे त्यामुळे पालक शिक्षकांनी सुद्धा चिंता व्यक्त
केली आहे.
त्यामुळे या विद्यार्थ्यांची प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेनंतर घ्याव्यात आणि त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारू नये अशा सूचना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज सर्व शाळांना दिल्या.
शालेय शिक्षण मंत्री यांनी सुचवलेल्या काही ठळक सूचना खालील प्रमाणे...
- पालकांनी परीक्षा व विद्यार्थ्यांच्या अडचणी संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाकडे सूचना पाठवाव्यात.
- भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व गणित या विषयांच्या पेपरमध्ये काही दिवसांचे अंतर ठेवण्यात यावे.
- लॉकडाउन व प्रतिबंधित क्षेत्र तसेच कोणाचा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा घेण्यात याव्यात.
- पालक संघटना व शिक्षकांनी शासनासोबत एकत्रित येऊन परीक्षा घेण्यासंदर्भात ठोस नियोजन करावे.
- सह्याद्री वाहिनीवरील दहावी-बारावीच्या तासिका वाढणार व अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका संच देण्यात येतील.
*************************
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.
1) WhatsApp Group (New Update)
Online Shikshak ASB 9
2) Telegram Channel
3) Facebook Page


If you have any doubts, please let be know.