शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ.१० वी) परीक्षेचा निकाल तयार करण्यासाठी कार्यपद्धती

0 Mr. Annasaheb Babar

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र ( इ.१० वी) परीक्षेचा निकाल तयार करण्यासाठी  कार्यपद्धती..

अ) नियमित विद्यार्थ्यांसाठी कार्यपद्धती

        इयत्ता ९ वी व इयत्ता १० वी या दोन्ही इयत्तांसाठी विषयनिहाय मूल्यमापन योजना ही समान असून याच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये इयत्ता ९ वीचे विषयनिहाय सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधारे संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत. कोविड -१९ च्या प्रादुर्भावामुळे शैक्षणिक वर्ष २०२०- २१ मध्ये राज्यातील विविध भागातील शाळा या स्थानिक परिस्थितीमुळे एकाचवेळी सुरू होऊ शकल्या नाहीत. तसेच राज्यातील सर्वच शाळांमध्ये इ.१० वी च्या मूल्यमापन प्रक्रियेतील सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा यांपैकी

सर्वच परीक्षा घेण्यात आल्या आहेतच असे नाही.

       वरील वस्तुस्थिती विचारात घेता वस्तुनिष्ठ मूल्यमापन होण्याच्या दृष्टीने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा सन २०२१ चा निकाल तयार करताना विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील इयत्ता ९ वी ची अंतिम संपादणूक आणि इ.१० वी मध्ये वर्षभरातील शाळांतर्गत केलेले मूल्यमापनाच्या आधारे प्राप्त संपादणूक यांचा खालीलप्रमाणे एकत्रित विचार करण्यात यावा

. १. विद्यार्थ्याच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील इ.९ वीच्या अंतिम निकालातील विषयनिहाय १०० पैकी गुणांचे इ.१० वी साठी विषयनिहाय ५० पैकी गुणात रूपांतर करणे. 

  • अ) मंडळामार्फत शाळांना गुण भरण्याची संगणकीय प्रणाली उपलब्ध करून देण्यात येईल. त्यामध्ये इ. १० वी परीक्षेसाठी प्रविष्ट असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे इ.९ वीच्या अंतिम निकालाचे विषयनिहाय १०० पैकी प्रत्यक्ष प्राप्त गुण भरण्याची सुविधा असेल. यामध्ये शाळांनी गुण भरल्यानंतर सदर गुणांचे विषयनिहाय ५० गुणांत संगणकीय प्रणालीव्दारे रूपांतर करण्यात येईल.

  • ब) सदर गुणांची वस्तुनिष्ठता पडताळण्यासाठी झाळांनी शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील इ.९ वीच्या सरल प्रणालीमध्ये शाळांनी नमूद केलेल्या इ. ९ वी च्या विद्यार्थीनिहाय वार्षिक निकालावरून करण्यात येईल. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये इयत्ता ९ वीचे विषयनिहाय सराव चाचण्या, प्रथम सत्र परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यांच्या आधारे संपादणूकीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करून वार्षिक निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत.

२. विद्यार्थ्याच्या इ.१० वीच्या प्रथम सत्र परीक्षा, सराव परीक्षा यामधील एक वा अधिक लेखी परीक्षांमधील विषयनिहाय ८० पैकी प्राप्त गुणांचे ३० पैकी गुणांत रूपांतर करणे.

  • अ) विद्यार्थ्याने प्रथम सत्र परीक्षा, सराव (पूर्व) परीक्षा या दोन्ही परीक्षा दिल्या असल्यास सदर दोन परीक्षांपैकी सर्वोत्तम एकूण गुण असलेल्या एका परीक्षेचे विषयनिहाय प्राप्त गुण विचारात घेऊन त्या ८० पैकी प्राप्त गुणांचे ३० पैकी गुणांत रुपांतर करण्यात यावे.
  • ब)  विद्यार्थ्याने प्रथम सत्र परीक्षा, सराव (पूर्व) परीक्षा यामधील एकच परीक्षा दिली असल्यास त्या परीक्षेतील विषयनिहाय ८० गुणांपैकी प्राप्त झालेल्या गुणांचे ३० पैकी गुणांत रुपांतर करावे.
  • क) अपवादात्मक परिस्थितीत ज्या माध्यमिक शाळांमध्ये प्रथम सत्र व सराव परीक्षा या परीक्षांचे आयोजन करणे शक्‍य झाले नाही अशा झाळांनी वर्षभरात इ.१० वीच्या अभ्यासक्रमावर आयोजित केलेल्या सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प यापैकी एक किंवा अधिक कार्याला विद्यार्थ्यास विषयनिहाय प्राप्त झालेल्या एकूण गुणांचे ३० पैकी गुणात रुपांतर करावे.

( विषयनिहाय ३० गुणांपेक्षा जास्त अथवा कमी गुणांचे मूल्यमापन केले असल्यास त्याचे ३०

पैकी गुणांत रुपांतर करावे.)

  • ड) ज्या शाळांमध्ये वरील प्रमाणे मूल्यमापन करणे हाक्‍्य झाले नाही त्यांनी सराव चाचण्या, स्वाध्याय, गृहकार्य, प्रकल्प इत्यादी पैकी एक किंवा अधिक बाबींची पूर्तता करून घेऊन त्या आधारे विद्यार्थ्यास विषयनिहाय प्राप्त झालेल्या एकूण गुणांचे ३० पैकी गुणात रुपांतर करावे.
  • इ) उपरोक्तप्रमाणे अंतिम केलेले विद्यार्थीनिहाय व विषयनिहाय ३० पैकी गुण मंडळाच्या संगणक प्रणालीत भरण्यात यावेत.

३. मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार विद्यार्थ्यास इ.१० वीच्या अंतिम तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन यामध्ये प्रत्यक्ष प्राप्त झालेले २० पैकी गुण अंतिम निकालात समाविष्ठ करणे.

  • अ) ज्या माध्यमिक शाळांनी विषयनिहाय मंजूर आराखडयानुसार तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा , अंतर्गत मूल्यमापन केलेले आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यास विषयनिहाय प्रत्यक्ष प्राप्त झालेले २० पैकी गुण संगणकीय प्रणालीत भरण्यात यावेत.
  • ब) अपवादात्मक परीस्थितीत ज्या माध्यमिक झाळांमध्ये तोंडी/ प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन करण्यात आले नसेल ते झाळांनी मंडळाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार पूर्ण करावे.
  • क)  याशिवाय श्रेणी विषयांसाठी विद्यार्थ्यांना प्राप्त झालेल्या श्रेणी संगणक प्रणालीमध्ये नमूद करावी.

४. उपरोक्त कार्यप्रणालीनुसार अंतिम करण्यात आलेल्या निकालाने समाधान न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 'कोविड -१९ ची परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर राज्य मंडळामार्फत प्रचलित पध्दतीनुसार आयोजित केल्या जाणाऱ्या श्रेणीसुधार योजनेअंतर्गत यापुढील लगतच्या दोन परीक्षांमध्ये प्रविष्ठ होण्याची संधी उपलब्ध असेल. माध्यमिक/ उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा श्रेणीसुधार योजनेचे (Class Improvement Scheme) सर्व नियम या विद्यार्थ्यांना लागू असतील.

ब) पूनर्परिक्षार्थांसाठी कार्यपद्धती 

क) खाजगी विद्यार्थांसाठी कार्यपद्धती 

द) तुरळक विषय घेऊन प्रविस्ट होणारे विद्यार्थी 

अधिक माहितीसाठी खालील जी.आर. पहा.


Tag- Procedures for preparation of SSC 2021 results,ssc je results 2021,ssc results 2021,ssc board result 2021,ssc results date 2021,10th ssc results 2021

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close