वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी 2022 | SENIOR AND SELECTION GRADE TRAINING 2022

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी 2022 | SENIOR AND SELECTION GRADE TRAINING 2022

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी 2022 | SENIOR AND SELECTION GRADE TRAINING 2020

      वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता परिषदेमार्फत पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक/प्राध्यापक/प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे.

यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे -

  • १. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://training.scertmaha.ac.in या संकेत स्थळास भेट द्यावी.
  • २. दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
  • ३. दि. ३१ डिसेंबर २०२१ रोजी २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले शिक्षक निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.
  • ४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २३ नोव्हेंबर, २०२१ ते २३ डिसेंबर, २०२१ पर्यंत सुरु राहील.
  • ५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. याबाबत नोंदणीनंतर पुढील सूचना संबंधितांना ई-मेलद्वारे देण्यात येतील.
  • ६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत- गट क्र.१- प्राथमिक गट, गट क्र. २- माध्यमिक गट, गट क्र. ३-उच्च माध्यमिक गट, गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट.
  • ७. प्रशिक्षणासाठी नोंदणी करतेवेळी शिक्षकाने स्वतःचा शालार्थ ॥), शाळेचा (1)8६ क्रमांक इत्यादी माहिती सोबत ठेवावी.
  • ८. नोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्‍यक 017 आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ येणार असल्याने आपला वापरात असणारा मोबाईल सोबत ठेवावा.
  • ९. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय.डी. असणे आव्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय.डी. वर पाठविण्यात येतील.
  • १०.नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास माहितीत बदल कराया बटणावर क्लिक करून सुधारित माहिती भरता येईल.
  • ११.प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्‍यक झासन निर्णय  https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी खालील बटनावर क्लिक करा. 

अधिक माहितीसाठी खालील परिपत्रक पहा.

Tag- teacher training,SENIOR AND SELECTION GRADE TRAINING 2022

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

">Responsive Advertisement
close