शाळांना सोमवार दि.०२ मे,२०२२ पासून उन्हाळी सुट्टी | Summer vacation to schools from Monday 02 May, 2022

 शाळांना सोमवार दि.०२ मे,२०२२ पासून उन्हाळी सुट्टी

शाळांना सोमवार दि.०२ मे,२०२२ पासून उन्हाळी सुट्टी | Summer vacation  to schools from Monday 02 May, 2022

 शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इ. १ लीते ९वी व इ. ११ वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत संदर्भीय शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत.

संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून पुढील प्रमाणे शासन निर्णय/परिपत्रक निर्गमित करण्याबाबत विनंती आहे.

१) सोमवार दि.०२ मे,२०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून, २०२२ पर्यंत ग्राहय धरण्यात येवून पुढील शेक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून,२०२२ रोजी सुरू होतील.

२) शाळांतून उन्हाळयाची व दिवाळीची दीर्घ सुटटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) यांच्या परवानगीने घ्यावी.

३) माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

४)आगामी शेक्षणिक वर्षांपासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, गाथ्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुस-या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस ) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चोथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस ) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील.

शासन निर्णय 

Tag- summer vacation,summer vacations,summer holidays for schools,summer holidays for schools in telangana,schools,school summer vacation,summer vacations in schools,summer vacation in delhi schools,vacation,schools reopen after summer vacation,haryana summer vacations in schools,summer holidays,reschedule summer vacations in delhi schools,school,summer,summer vacation in primary school of gujarat,summer holidays for schools and colleges


Post a Comment

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने
close