शाळांना दिवाळीची सुट्टी असणार 18 दिवस ! दिनांक 21 ऑक्टोबर 2022 पासून दिवाळी सुरू होत असल्याने शाळा , शिक्षक व विद्यार्थ्यांना 20 ऑक्...
शाळांना दिवाळीची सुट्टी असणार 18 दिवस !
दिनांक 21 ऑक्टोबर 2022 पासून दिवाळी सुरू होत असल्याने
शाळा, शिक्षक व
विद्यार्थ्यांना 20 ऑक्टोबर
ते 7 नोव्हेंबर
सुट्टी असणार आहे. तसेच 8 नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती असल्याने त्या दिवशीही
सुट्टी असेल. म्हणजेच 9 नोव्हेंबर पासून शाळा दुसऱ्या सत्रातील सुरू होतील, असे प्राथमिक शिक्षण विभागाकडून
सांगण्यात आले.
दिवाळीची सुट्टी असल्याने शाळा 18 दिवस बंद असणार आहेत. मागील दोन
वर्षापासून कोरोना असल्याने ऑनलाइन अध्यापन काही प्रमाणात घेता आले परंतु
प्रामुख्याने पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे अंकगणित, अक्षर ओळख तसेच मूलभूत गणितीय
क्रिया घेता आल्या नाहीत किंवा त्यामध्ये विद्यार्थी मागे राहिले आहेत. अजूनही
असंख्य विद्यार्थी अभ्यासात मागे असून अशा मुलांना दिवाळीच्या सुट्टीमध्ये वाचन
सराव, अंक व
अक्षर ओळख होण्यासाठी दिवाळीचा अभ्यास द्यावा किंवा जमल्यास सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांच्या
संपर्कात राहावे.
शिक्षकांसह राज्य सरकारी
कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे वेतन ऑक्टोबर अखेरीस मिळणार
दिवाळी निमित्त राज्य सरकारी
कर्मचाऱ्यांना यंदा प्रत्येकी 12.5 ते १५ हजारांचा अग्रिम मिळेल. पण, त्यात शिक्षकांचा समावेश असणार
नाही. दिवाळीमुळे शिक्षकांसह राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना नोव्हेंबरचे वेतन ऑक्टोबर
अखेरीस मिळणार आहे.
दिवाळीपूर्वी
शिक्षकांच्या जिल्ह्याअंतर्गत बदली
दिवाळीपूर्वी शिक्षकांच्या
जिल्हांतर्गत बदल्याजिल्हा परिषदेच्या
२७९८ शाळांमधील शिक्षकांची आंतरजिल्हा बदली ८ - १० दिवसांत दिवाळी
सुट्यांपूर्वी होणार आहेत. एकाच शाळेवर ५ वर्षे सेवा बजावलेल्या शिक्षकांची
दुसऱ्या शाळेत बदली होणार आहे. त्यासाठी त्यांना एकूण २० शाळांचे पर्याय द्यायचे
आहेत. ऑनलाइन पद्धतीने त्यांना पर्यायातील एक शाळा मिळेल. यंदा प्रथमच ही बदली
प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असल्याने वशिलेबाजी किंवा मानवी हस्तक्षेप चालणार
नाही. ज्या तालुक्यात शिक्षक कमी, त्या ठिकाणीही काही शिक्षकांची बदली होऊ शकते.
-------------------------------
Tag-दिवाळी सुट्टी,शासकीस सुट्टी,शाळा कधी सुरु होणार,शासकीय सुट्या 2022-23,शासन निर्णय शासकीय सुट्या,उन्हाळा शाळा सुरू,शाळा सुरु करणे मार्गदर्शक सूचना,शाळा सुरू,सार्वजनिक सुट्ट्या २०२२,शाळा सुरु करणे,शाळा,माझी शाळा माझे कार्यालय,माझी मराठी शाळा,nas सर्वेक्षणात कोणत्या विदयार्थ्यांची निवड होईल,lokmat 18 news marathi live,महाराष्ट्र बोर्ड,nas कोणत्या शाळेची होईल,राष्ट्रीय संपादणूक चाचणी,राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण 2021
COMMENTS