१२ वी चा निकाल उद्या जाहीर होणार
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षा
फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या निकालाबाबत
मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये
आयोजित करण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल
मंडळाच्या विहित कार्यपद्धतीनुसारजाहीर करण्यात येणार आहे. त्याचा तपशील
पुढीलप्रमाणे आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छ. संभाजीनगर, मुंबई, लातूर,
अमरावती, नाशिक, कोल्हापूर
व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेचा निकाल खालील अधिकृत संकेतस्थळांवर
सोमवार दिनांक ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाइन
जाहीर करण्यात येत आहे. अधिकृत संकेतस्थळांची यादी पुढीलप्रमाणे आहे:
१. https://results.digilocker.gov.in
४. https://results.targetpublications.org
५. https://results.navneet.com
६. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results
८. https://www.indiatoday.in/education-today/results
९. https://www.aajtak.in/education/board-exam-results
परीक्षा प्रविष्ट झालेल्या सर्व
विद्यार्थ्यांनी विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवर उपलब्ध होतील
व सदर माहितीचा प्रत (प्रिंट आऊट) घेता येईल. त्याचप्रमाणे Digilocker
App मध्ये Digital गुणपत्रिका संबंधित करुन
ठेवण्यात येतील व तेथे उपलब्ध करुन देण्यात येतील.
तसेच https://mahahsscboard.in
(in college login) या संकेतस्थळावर कनिष्ट महाविद्यालयांना एकत्रित
निकाल निकाल उपलब्ध होईल.
सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे –
१) ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांस स्वताच्या
अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने
संपादित केलेल्या गुणांची गुण पडताळणी व उत्तरपत्रिका छायाचित्रे, पुनर्मूल्यांकनासंबंधीत विभागीय मंडळाकडे
ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळ https://mahahsscboard.in वरून
स्वता किंवा कनिष्ट महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे.
यासाठी आवश्यक अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुण
पडताळणीसाठी /उत्तरपत्रिका छायाप्रतीसाठी, मंगळवार दिनांक ०६/०५/२०२५
पासून, मंगळवार दिनांक २०/०५/२०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे. त्यासाठी
शुल्क Debit
Card/Credit Card/UPI/Net Banking यांद्वारे online शुल्क भरता येईल.
२) फेब्रुवारी-मार्च २०२५ उच्च माध्यमिक
प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या उत्तीर्णिकांचे पुनर्मूल्यमापनासाठी ऑनलाईन
पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर करावयाचे आहेत. प्रथम उत्तरपत्रिकेची
छायाचित्रे (कॉपी) विद्यार्थ्यांना मिळाल्यानंतर दिलेल्या कार्यालयीन कालावधीत पाच
दिवसात पुनर्मूल्यमापनासाठी कार्यालयीन वेळेत संबंधित विभागीय मंडळाच्या विविध
उपकार्यालयांमध्ये प्राप्त करावेत. मंडळाचे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू
शकतील. त्या संदर्भात उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यमापन कार्यालयाच्या संकेतस्थळावर
त्यांना अधिक माहितीबाबत संबंधित विभागीय मंडळास संपर्क साधावा.
३) फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेत सर्व विषयांमध्ये प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लागलेल्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रुवारी-मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी/गुणउत्क्रांती (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
४) जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात
येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार
व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बुधवार दिनांक ०७/०५/२०२५
पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्रे भरता येणार आहेत.
त्याबाबतचे परीक्षक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
दिनांक: ०४/०५/२०२५
(देविदास कुलाळ)
सचिव
राज्य मंडळ, पुणे
- ०४
If you have any doubts, please let be know.