आंतरराष्ट्रीय योग दिन : - 21 जून
आपल्या व्यक्तीमत्वाचे शारीरिक, मानसिक, भावनिक, अध्यात्मिक व सामाजिक असे विविध पैलू असतात. या सर्व पैलूंमध्ये संतुलन प्राप्त करण्यासाठी उपयुक्त पद्धती म्हणजे "योगाभ्यास"
■ योगाची अंगे :~
१. यम :~ आचरण /वर्तनविषयक
२. नियम :~ आत्मशुध्दी.
३. आसन :~ शारीरिक व मानसिक स्थिती.
४.प्राणायाम :~ श्वास.
५. धारणा :~ चिंतन.
■ योगाभ्यासाचे फायदे :~
१. शरीराच्या अंतर्गत अवयवांची कार्यक्षमता वाढते.
२. रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
३ रक्त शुध्द व प्रवाही राहते.
४.पाठीचा कणा लवचिक राहातो.
५. शरीर लवचीक बनते.
६.काम करण्याचा उत्साह वाढतो.
७.मनःशांती मिळते.
८.एखाद्या गोष्टीवर मन केंद्रित होण्यास
मदत मिळते.
★===========★★===========★
🧘♂ ★आंतरराष्ट्रीय योग दिवस; केवळ सुरुवात नव्हे सातत्य हवे!★
केवळ आजारांवर मात करण्यासाठी नव्हे तर मानसिक आणि शारिरीक संतुलन ठेवण्यासाठी 'योग' हा फार महत्त्वाची भूमिका साकारतो. त्याचमुळे भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या योगाला आज जगभरात मोठे महत्व मिळाले आहे.
याच पार्श्वभूमीवर पाचवा आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. मात्र आंतरराष्ट्रीय योग दिवसाची सुरुवात कधी आणि कशी झाली? याबाबत आज सविस्तर जाणून घेऊयात...
▪ 27 सप्टेंबर 2014 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र संघातील आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय योग दिनाची गरज व्यक्त केली.
▪ भारताने संयुक्त राष्ट्र महासभेत योग दिवसाची शिफारस केली. 193 पैकी 175 देशांनी प्रस्ताव तात्काळ स्वीकारला.
2014 साली 11 डिसेंबरला संयुक्त राष्ट्र संघाने योगाचं महत्व मान्य करत 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याची घोषणा केली.
🤔 21 जूनची निवड का? :~ 21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस आहे. हा सूर्याचे दक्षिणायन सुरु होण्याचा हा काळ आहे. या संक्रमण काळात योगाचा जास्त फायदा पोहोचतो. म्हणून या दिवसासाठी 21 जूनची निवड करण्यात आली आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🧐 ■2019 थीम :~ "YOGA FOR CLIMATE ACTION"
💁♂ योगा शिकताना 'या' खबरदारी घ्या..!
1) नवीन योगा शिकणारे लोक बहुतेकदा इतरांशी तुलना करण्याच्या नादात स्वत:ला इजा करून घेताना दिसतात. जे चुकीचे आहे
2) वाढत्या वयामुळे शरीराची लवचिकता आणि हालचालींवर मर्यादा येतात. त्यामुळे योगा शिकताना वयोमानानुसार शारीरिक स्थितीत होणारा बदल ध्यानात न घेणे गरजेचे आहे.
3) प्रत्येक आसन हे योग्य माहिती घेऊन करणे गरजेचे असते. योगा वर्गांमध्ये अनेकजण नवीन उत्साहाच्या भरात क्षमतेपेक्षा अधिक ताण देतात आणि मग त्यांना दुखापतीचा सामना करावा लागतो.
4) अनेक दिवस योगापासून दूर राहिल्यानंतर पुन्हा योगासाधनेला सुरूवात कराल तेव्हा कदाचित पूर्वी जमणाऱ्या अनेक गोष्टी करणे तुम्हाला शक्य होणार नाही. त्यामुळे सुरूवातीच्या दिवसांत आठवड्यातून किमान तिनदा तरी योगाप्रकार नियमितपणे करणे चांगले.
5) एखादे आसन जमत नाही. या प्रश्नांमुळेच लोक हताश होतात. निराश झालेले हे लोक मग, योगासन ही गोष्ट आपल्यासाठी नाहीच, असा ग्रह करून प्रयत्न करण्याचे थांबवतात. जे चुकीचे आहे.
🗣 ●पंतप्रधान मोदींनी दिला कानमंत्र* :~
समाजातील गरिबांपर्यंत योगा पोहचला तर ते आजारापासून वाचू शकतील. निरोगी आरोग्यासाठी केवळ औषधे व शस्त्रक्रिया पुरेशा नाहीत. त्यामुळे सरकार योगाभ्यासाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य कसे सुधारता येईल, यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.
योगाचं पालन संपूर्ण जीवनभर केले पाहिजे. योग कधीही वय, रंग, जात-पात, धर्म-पंत, श्रीमंत-गरीब, प्रांत-देश असा भेदभाव करत नाही. योग सर्वांचा आहे आणि सर्व जण योगाचे आहेत.
If you have any doubts, please let be know.