शहीद दिन : - 23 मार्च
हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांचे स्मरण करू या, राष्ट्रभक्तीचे प्रतीक असलेल्या महान क्रांतिकारक यांचे आज स्मरण करू या...!!
■■ २३ मार्च १९३१ चा दिवस..■■
संध्याकाळी अंदाजे ७ वाजण्याच्या सुमारास भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीसाठी कोठडीबाहेर काढण्यात आले. भगतसिंगाच्या उजव्या बाजूस राजगुरू आणि डाव्या बाजूस सुखदेव होते . ते अतिशय शांतपणे आणि धैर्याने
' भारतमाता की जय ' आणि ' वंदे मातरम् ' चा जयघोष करीत फाशीच्या तख्ताकडे निघाले .
मग भगतसिंग यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली की , आपणास फाशी पूर्वी दोन मिनिटे आपल्या घोषणा करू द्याव्या. तुरुंगाच्या अधिकाऱ्याने मौन राखून त्यांची ती विंनंती मान्य केली . तिघांनी मग जोरजोरात आपल्या घोषणा दिल्या. त्यानंतर ते तिघेही फाशीच्या तख्तावर चढले . त्यांचे पाय घोट्याशी बांधण्यात आले . प्रत्येकाने आपल्या फासाचे चुंबन घेतले .
फाशीची काळी टोपी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओढण्यात आली . नंतर ते फास त्यांच्या गळ्यात टाकण्यात आले. त्याची गाठ घट्ट झाली, तेव्हांच त्यांच्या घोषणा थांबल्या. त्यांचा आवाज क्षीण झाला.
सगळीकडे शांतता पसरली . तख्तावरचा खटका ओढला जाताच त्याच्या फळ्या दुभंगल्या नि ते तिघेही वीर मृत्युच्या खोल दरीत लोंबकळू लागले . फळ्या पडण्याचा आवाज होताच तुरुंगाच्या सर्व कैद्यांनी आपल्या कोठाड्यांचे गज जोर जोरात वाजवून ' वंदे मातरम् ' "भारत माता की जय" च्या घोषणा दिल्या .
आणि मग काही वेळाने सर्वत्र स्मशानशांतता पसरली ...!!
"२३ मार्च २०१८ अर्थात हुतात्मा दिन..."
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे तिघेही लाहोर जेल मध्ये २३ मार्च १९३१ ला संध्याकाळी ७.३३ वाजता ' भारत माता की जय' , 'वंदे मातरम' म्हणत हसत हसत फासावर चढले.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजां नंतर देशासाठी पारदास्यत्वाच्या श्रृखंलेत अडकलेल्या मायभुमीच्या स्वातंत्र्यासाठी व रक्षणासाठी तुम्ही स्वतःचे प्राणर्पण केले व अमर झाले .
आज तुम्ही ह्या जगात नाहीत पण तुमचा पराक्रम, तुमचे शौर्य, तुमचा त्याग आणि तुमचे बलिदान आम्हाला जीवनाच्या प्रत्येक क्षणाला प्रेरणा देत राहील....
आजही तुमची देशनिष्ठा भारतीयांच्या मनात जिवंत आहे...
दोस्ती असावी तर तुमच्या सारखी जी अगदी शेवटच्या श्वासापर्यंत सोबत राहिल....
भगतसिंग , सुखदेव , राजगुरू यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र त्रिवार अभिवादन...!!
If you have any doubts, please let be know.