--> क्रांती दिन : - 9 ऑगस्ट | Online Shikshak ASB

क्रांती दिन : - 9 ऑगस्ट

क्रांती दिन : - 9 ऑगस्ट

           मुंबईत भऱलेल्या कॉंग्रेस अधिवेशनात महात्मा गांधींनी ‍केलेली 'छोडो भारत'ची गर्जना ‍आणि दिलेला ''करेंगे या मरेंगे'' हा मंत्र नऊ ऑगस्टच्या दिवशी संपूर्ण देशात पसरला होता. त्यामुळे यादिवशी क्रांतीची ज्योतच जणू पेटली. देशभरात ब्रिटिश सत्तेला हाकलून लावण्यासाठी आंदोलनांना सुरवात झाली. ब्रिटिश सत्ता पार हादरून गेली होती.




      ९ ऑगस्ट. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ९ ऑगस्ट १९४२ या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या दिवशी तत्कालीन कॉंग्रेसच्या नेतृत्वाने भारतातील इंग्रज सरकारला चले जाव चा इशारा दिला. या दिवसापासून स्वातंत्र्यासाठी लढणार्‍या भारतीयांनी करेंगे या मरेंगे अशी निर्वाणीची भूमिका घेऊन, इंग्रजांना छोडो हिंदुस्थान हा अखेरचा इशारा दिला होता. तोपर्यंत शांततेच्या मार्गाने स्वातंत्र्याचे आंदोलन करणार्‍या कॉंग्रेस आणि नेत्यांनी प्रथमच क्रांतीची भाषा वापरली होती. त्यामुळे हा ९ ऑगस्ट क्रांतीदिन म्हणून पुढे ओळखला जाऊ लागला. इतकी स्पष्ट आणि कडक भूमिका घेऊनही, इंग्रजांनी आणखी पाच वर्षे आपल्याला स्वातंत्र्य दिलेच नाही, हेही महत्त्वाचे आहे. ९ ऑगस्ट १९४२ ते १५ ऑगस्ट १९४७ हा कालावधी प्रत्येक भारतीयाने लक्षात ठेवायलाच हवा, इतका ऐतिहासिक आणि महत्त्वाचा आहे.







      १९४२ च्या जुलैमध्ये छोडो हिंदुस्थानचा इशारा, नव्हे, आदेशच इंग्रजांना देण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतला होता. कॉंग्रेसच्या त्या प्रस्तावात, हिंदुस्थानातली ब्रिटिश राजवट ताबडतोब संपुष्टात आली पाहिजे. हिंदुस्थान स्वतंत्र होणे हे केवळ त्याच्याच हिताचे नसून सार्‍या जगाचेही हित त्यात सामावलेले आहे. हुकूमशाही, साम्राज्यशाही, लष्करशाही आदी अनिष्ट प्रवृत्तींशी यशस्वी मुकाबला करण्यासाठी हिंदुस्थान स्वतंत्र होणे आवश्यक आहे. असे म्हटले होते. त्यावेळचे कॉंग्रेसचे अध्यक्ष मौलाना आझाद यांनी ७ ऑगस्ट १९४२ ला या प्रस्तावाच्या कॉंग्रेस महासमितीच्या मंजुरीसाठी मुंबईला अधिवेशन बोलावले होते. कार्यसमितीच्या प्रस्तावाला महासमितीनेही प्रचंड बहुमताने पाठिंबा दर्शविला होता.




        महात्मा गांधींच्या नेतृत्वात इंग्रज सरकारविरुद्ध फार मोठ्या प्रमाणावर देशभर अहिंसक जनआंदोलन लवकरच उभे राहील, अशा शब्दांत महासमितीने आपला निर्धार व्यक्त केला होता. इंग्रज सरकारला स्वातंत्र्यवीरांच्या या ह्यचले जावह्ण ठराववजा आदेशात १८५७ च्या सशस्त्र बंडांची बीजे दिसली होती. त्यामुळेच महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार वल्लभभाई पटेल अशा ज्येष्ठ नेत्यांना ९ ऑगस्टच्या पहाटेच इंग्रज सरकारने अटक करून अज्ञातस्थळी रवाना केले होते.




        कॉंग्रेस महासमिती सदस्य सकाळी ९ वाजता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसाच्या कामकाजासाठी गोवालिया टँक मैदान या अधिवेशनस्थळी जमले तेव्हा त्यांना प्रमुख नेत्यांच्या अटकेची बातमी कळली. सरकारच्या या अटकसत्रामुळे संपूर्ण देशातच संतापाची लाट उसळली. नेते नजरेआड झाले तरी आपण चले जाव आंदोलन चालूच ठेवू, असा निर्धार जागोजागी जाणवू लागला. ब्रिटिश साम्राज्यशाहीचा उरलासुरला धाकही जनतेच्या या निर्धाराने निपटून काढला.






              ◆ लढाई जनाजनांची ◆




    महात्मा गांधींसारख्या लोकोत्तर विभूतीने आपल्या देशबांधवांना ह्यकरेंगे या मरेंगेह्ण या निग्रहाने चले जाव अभियान चालवण्याचा संदेश दिला होता. पण, प्रत्यक्षात कोणती पावले उचलायची, हे अभियान नेमके कसे चालवायचे, यासंबंधी काहीच सांगितलेले नव्हते. इंग्रज सरकारने गांधीजींसारख्या नेतृत्व करणार्‍या सार्‍याच प्रमुखांना काही सांगण्यापूर्वी, दिशानिर्देश देण्याची संधीही न देता स्थानबद्ध करून टाकले होते. त्यापूर्वी गांधीजी या चळवळीबद्दल आपल्या सहकार्‍यांशीही बोलले नव्हते. ह्यह्यआपण हिंदुस्थान सोडून जायला तयार आहोत, असे ब्रिटिश सरकार जाहीर करायला तयार नसेल तर आपण एक दिवस देशभर हरताळ पाळावा,ह्णह्ण एवढेच काय ते बोलले होते. एक दिवसाच्या हरताळाने, आजच्या भाषेत बंदने, काय साध्य होईल, असा प्रश्‍न त्यावेळच्या इतर नेत्यांना पडला होता.







     आपली कृती शांततामय आणि अहिंसक असली पाहिजे,ह्ण असेही ८ ऑगस्टच्या त्या प्रस्तावात म्हटले होते. त्यामुळे गांधीजींना लगेच अटक होईल, असेही कुणाला वाटले नव्हते. पण, इंग्रज सरकार त्या वेळी तेवढ्यावरच थांबले नाही. त्याने कॉंग्रेस संघटना बेकायदेशीर ठरवली, ठिकठिकाणच्या पक्ष कार्यालयांना सील ठोकले, मुखपत्रांचे प्रकाशन थांबवले. देशात दहशतीचे वातावरण निर्माण व्हावे असाच प्रयत्न इंग्रज सरकारचा त्या वेळी होता. या सरकारी अरेरावी व दडपशाहीविरुद्ध ९ ऑगस्टलाच तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्याची पहिल्या दिवशीची केंद्रे मुंबई, पुणे व अहमदाबाद होती. पुढे देशभर हे आंदोलन पसरले.








त्यावेळचा स्वातंत्र्यलढा गांधीजी आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वात असला, तरी समाजवादी पक्षाची भूमिका ह्यगांधीजींनी इंग्रजांविरुद्ध लढाऊ पवित्रा घेतला पाहिजे, अशीच होती. त्यामुळे ९ ऑगस्टपासूनच्या चले जाव आंदोलनात समाजवादी पक्षाने महत्त्वाची भूमिका बजावून त्याला प्रखरता मिळवून दिली होती. समाजवाद्यांनी नामांतर, वेशांतर करून, भूमिगत होऊन जनजागृती सुरू केली. त्या आंदोलनात रेल्वेरूळ उखडणे, स्थानकांची मोडतोड करणे, टपाल कार्यालये जाळणे- उद्‌ध्वस्त करण्याचे प्रकार देशभर झाले. विशेषत: बंगाल आणि महाराष्ट्रात ह्यप्रतिसरकारेह्ण स्थापण्यात आली. या प्रतिसरकारांमुळे मूळ इंग्रज सरकार खवळले आणि त्याने दडपशाही सुरू केली. त्यात दहा हजारांहून अधिक मृत्यू, तितकेच जखमी, महिलांची विटंबना, घरांची पोलिसांकडून जाळपोळ, लाखोंना अटक अशा नोंदी आहेत. ही चले जाव चळवळ सेनापतीच्या अनुपस्थितीत सैनिकांनी केलेल्या लढाईसारखी होती, असेही तिचे वैशिष्ट्य मानले गेले आहे. या क्रांतिलढ्याला वंदन.


COMMENTS

नाव

25% less syllabus,1,इंटरनेट,5,ऑनलाइन शिक्षण,188,करिअर,7,गणितातील ट्रिक्स,3,गणितीय कोडी,3,गणितीय सूत्रे,3,जीवन शिक्षण,2,पदवीधर मतदार ऑनलाईन नोंदणी,2,पवित्र पोर्टल,2,प्रगती पत्रक नोंदी,1,भारतीय गणितज्ञ,1,मराठी कोडी,4,शिष्यवृत्ती परीक्षा,4,शिष्यवृत्ती-परीक्षा,2,Bridge Course,16,Covid-19,4,Diksha App,9,GK,6,GR,31,health,3,HSC QUE BANK,1,INSPIRE AWARD,1,Learn with Fun,30,LIVE,43,Math Quiz,14,NATIONAL ACHIEVEMENT SURVEY,3,Navoday,4,NEWS,196,NMMS परीक्षा,8,online education stocks,11,Online Exam,7,Online Study,126,Pavitra Portal,4,Result,16,Scholarship form,3,SSC FORM,12,SSC IMP,143,ssc study,67,story,13,Study series,9,Teacher-Training,16,Teachers Day,2,UDISE PLUS,1,Useful-Websites,1,
ltr
static_page
Online Shikshak ASB : क्रांती दिन : - 9 ऑगस्ट
क्रांती दिन : - 9 ऑगस्ट
क्रांती दिन : - 9 ऑगस्ट
Online Shikshak ASB
https://www.onlineshikshakasb.com/p/9.html
https://www.onlineshikshakasb.com/
https://www.onlineshikshakasb.com/
https://www.onlineshikshakasb.com/p/9.html
true
184662719454746651
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read More Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
close