दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा व सूचना
दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूपखूप शुभेच्छा ...
इयत्ता दहावी विद्यार्थी
व पालकांना महत्वपूर्ण सूचना …
उशीरा येणाऱ्या विद्यार्थ्यास
परिक्षेला बसू दिले जाणार नाही....
मंगळवार दिनांक 3 मार्च पासून इयत्ता दहावी
बोर्ड परीक्षेला सुरुवात होत आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केंद्र संचालकांच्या सभेत दिलेल्या सूचना व मंडळाकडून
प्राप्त झालेल्या मार्गदर्शक पुस्तिकेतील सूचना अन्वये परीक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्याने
प्रथम सत्रात सकाळी १०:३० वाजता व दुपारच्या सत्रात दुपारी २:३० वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहचायचे आहे.
इशारा
घंटा झाल्यावर परीक्षा दालनात सकाळी १०:४०
वाजता उत्तरपत्रिका दिल्या जातील.
१०;५० वाजता
प्रश्नपत्रिका दिल्या जातील
११:०० वाजता
वेळेवर उत्तर पत्रिका लिहिण्यास सुरुवात करावी.
परीक्षा सुरू झाल्यानंतर ११:१०
मिनिटापर्यंत उशिरा प्रवेश दिला जाईल.
११:१० मिनिटां नंतर उशिरा येणाऱ्या
विद्यार्थ्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही.
यावर्षी हा बदल झालेला आहे.याची सर्वांनी नोंद
घ्यावी .
म्हणून माझ्या
विद्यार्थी मित्रांनो आपण घरून लवकर निघावे.सकाळी १०:३० च्या आधी परीक्षा केंद्रावर पोहचावे अशी आपणास विनंती व आव्हान करीत आहे. वेळेच्या चुकीमुळे आपले शैक्षणिक
नुकसान होऊ नये याची काळजी घ्यावी.
तसेच
सोबत मूळ हॉल तिकीट असणे बंधनकारक आहे .
देणे गरजेचे आहे हॉल तिकीट मघ्ये काही correction असल्यास बोर्डाला
केलेला पत्रव्यवहाराची एक प्रत संबंधित केंद्राला.
तरी याची ही नोंद घ्यावी .
परीक्षेकरिता आपणास शुभेच्छा आणि सदिच्छा…
COMMENTS