चांगल्या गुणांसाठी या पद्धतीने सोडवा गणिताची प्रश्नपत्रिका
गणित भाग -I हा पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय आहे. विकल्पासहित 60 पैकी 40 गुण मिळवायचे असतात, दोन तासात 40 गुण मिळविण्यासाठी प्रत्येक मिनिटाचे नियोजन करणे गरजेचे आहे परीक्षेत प्रश्नपत्रिका सोडवताना पुढील काळजी घ्यावी.
1. पहिल्या दहा मिनिटात प्रश्नपत्रिकेचे
पूर्णपणे वाचन करावे त्यातील हमखास येणारे गणिते अगोदर सोडून घ्यावेत ज्या गणितासाठी
थोडा विचार करावा लागणार आहे त्यासाठी उत्तरपत्रिकेत जागा शिल्लक ठेवून पुढील प्रश्नातील
गणिते क्रमाने सोडवावी.
2. नवीन प्रश्न नवीन पानावर सुरू
करावा. प्रश्नाचा व उप प्रश्नाचा क्रमांक योग्य पद्धतीने लिहावा.
3. प्रश्न क्रमांक 3(अ) पर्यंत काठिण्य पातळी कमी असल्यामुळे
पातळी कमी असल्यामुळे ते कमीत कमी वेळेत सोडवावेत म्हणजे उपयोजित प्रश्नांना वेळ देता येईल.
4. गणिते सोडवताना पायरी-पायरीने सोडवावेत कच्चे काम (रफ वर्क) उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर नाव टाकून करावे.
5. बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर
पर्याय क्रमांकात लिहावे.
6. शाब्दिक उदाहणांची उत्तरे शेवटी
पूर्ण वाक्यात एककासहित लिहावीत
7. समीकरणे सोडवताना प्रश्नपत्रिकेत विशेष उल्लेख नसेल
तर जी पद्धत सोपी वाटते त्या पद्धतीने सोडवावी.
tn व Sn सूत्रावर आधारित उदाहरणासाठी अचूक सूत्राचा वापर करावा .
8. अर्थनियोजन वर आधारित गणिते
सोडवताना जीएसटी सीजीएसटी एसजीएसटी या पैकी उदाहरणात आवश्यक त्याचेच गणन करावे.
9. संभाव्यता या प्रकरणाच्या बाबतीत
फलिते, नमुना, अवकाश व संभाव्यता यातील फरक नीट लक्षात
घ्यावा.
10. आलेखाचे प्रश्न सोडवताना उत्तरपत्रिकेत गणन केलेल्या पानावर
आलेख असा स्पष्ट उल्लेख करावा आलेख कागदावर प्रमाण लिहिण्यास विसरू नये.
11. मध्य, मध्यक व बहुलक काढताना सूत्रातील बाबी अगोदर नोंदवाव्या व अचूक
सूत्र वापरावे.
अशाप्रकारे गणित विषयाची चांगली तयारी करून लेखी
परीक्षेला सामोरे जावे पेपरला जाताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा कोणताही ताण तणाव
टेन्शन न घेता शांतचित्ताने पेपर लिहावा.
परीक्षेसाठी
खूप खूप शुभेच्छा!
Tags
SSC IMP
