दहावीचा निकाल उद्या ८ मे २०२६ रोजी जाहीर | SSC Result 2026 Maharashtra Board Official Update

📢 दहावीचा निकाल उद्या ८ मे २०२६ रोजी जाहीर !

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची अधिकृत घोषणा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेच्या निकालाबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी आणि पालक ज्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते तो निकाल आता उद्या जाहीर होणार आहे.

📅 निकालाची तारीख व वेळ

🗓️ शुक्रवार, दिनांक ८ मे २०२६

⏰ दुपारी १:०० वाजता

दहावीचा निकाल ऑनलाईन पद्धतीने अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.

🌐 निकाल कुठे पाहता येणार ?

विद्यार्थ्यांना खालील अधिकृत संकेतस्थळांवर आपला सीट नंबर व आईचे नाव टाकून निकाल पाहता येणार आहे.

📌 Digital गुणपत्रिका सुविधा

मंडळाने विद्यार्थ्यांसाठी DigiLocker App वर Digital गुणपत्रिका उपलब्ध करून देण्याची सुविधा सुरू ठेवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन गुणपत्रिका डाउनलोड करून सुरक्षित ठेवता येणार आहे.

  • 📄 ऑनलाईन गुणपत्रिका डाउनलोड सुविधा
  • 📱 DigiLocker मध्ये Digital Marksheet
  • 🏫 School Login द्वारे शाळांना निकाल उपलब्ध

📌 गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेची छायाप्रत

निकालानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या कोणत्याही विषयातील गुणांची पडताळणी करता येणार आहे. तसेच संबंधित विषयाच्या उत्तरपत्रिकेची छायाप्रत देखील ऑनलाईन अर्जाद्वारे मिळवता येईल.

महत्त्वाची सूचना :

उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या ५ दिवसांच्या आत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करणे आवश्यक राहील.

गुणपडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज प्रक्रिया शनिवार दिनांक ०९/०५/२०२६ ते शनिवार दिनांक २३/०५/२०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.

💳 ऑनलाईन शुल्क भरण्याची सुविधा

विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येणार असून खालील सुविधा उपलब्ध राहतील.

  • Debit Card
  • Credit Card
  • UPI
  • Net Banking

📌 Class Improvement Scheme

फेब्रुवारी-मार्च २०२६ परीक्षेत सर्व विषयांत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना श्रेणी सुधार योजनेअंतर्गत सलग तीन संधी उपलब्ध राहतील.

  • ✅ जून-जुलै २०२६
  • ✅ फेब्रुवारी-मार्च २०२७
  • ✅ जून-जुलै २०२७

या योजनेमुळे विद्यार्थ्यांना आपली श्रेणी आणि गुण सुधारण्याची मोठी संधी मिळणार आहे.

📌 पूरक परीक्षा २०२६

जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पूरक परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार आणि खाजगी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. यासंदर्भातील स्वतंत्र परिपत्रक मंडळाकडून लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

📢 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • निकाल पाहताना सीट नंबर जवळ ठेवावा.
  • फक्त अधिकृत संकेतस्थळावरूनच निकाल तपासावा.
  • गुणपडताळणीसाठी वेळेत अर्ज करावा.
  • पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे.
  • अर्ज करताना माहिती काळजीपूर्वक भरावी.

🎯 अशाच शैक्षणिक अपडेट्ससाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या

🌐 www.onlineshikshakasb.com

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close