Bridge Course ऑनलाईन उद्धाटन - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र , ...
Bridge Course ऑनलाईन उद्धाटन - राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे यांचेमार्फत निर्मित सेतू अभ्यासक्रम (Bridge Course) चाऑनलाईन उद्धाटन व विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे याकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा उद्घोधन कार्यक्रम
उपरोक्त
विषयास अनुसरून, सद्यस्थितीमध्ये कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सन
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत.
-शाळा बंद,पण शिक्षण सुरुः या
कार्यक्रमांतर्गत ऑनलाईन/ऑफलाईन
माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात
येत आहेत. तथापि यामध्ये सर्वच विद्यार्थ्यांच्या सर्व
इयत्तानिहाय विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी येऊ शकतात.त्यामुळे
मागील वर्षातील क्षमता संपादित न होता विद्यार्थी पुढील शैक्षणिक वर्षामध्ये
प्रविष्ट झाले असल्याची शक्यता गृहीत धरून राज्य शैक्षणिक संशोधन व
प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे यांचेमार्फत सर्वच विद्यार्थ्यांसाठी सेतू
अभ्यासक्रम तयार करण्यात आलेला आहे.
सदर
सेतू अभ्यासक्रमाचे उद्घाटन सोमवार दिनांक २८ जून २०२१ रोजी सकाळी.११.०० वाजता मा. ना.वर्षाताई
गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे हस्ते ऑनलाईन
स्वरूपामध्ये होणार आहे. मा. वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव,
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , मा. विशाल सोळंकी, आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे, मा. राहुल द्विवेदी, राज्य प्रकल्प संचालक, महाराष्ट्र प्राथमिक
शिक्षण परिषद, मुंबई यांच्या उपस्थितीमध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात
आलेले आहे.
तसेच
विद्यार्थी अध्ययन सुरु रहावे यासाठी परिषदेमार्फत विविध उपक्रम सुरु करण्यात
आलेले आहेत.या सर्व उपक्रमांची योग्य कार्यवाही संपूर्ण
राज्यामध्ये होणे आवश्यक आहे.यासाठी शिक्षक,मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख व इतर पर्यवेक्षीय यंत्रणा तसेच
सर्व प्रशासकीय अधिकारी यांची भूमिका अत्यंत
महत्वाची असून यादृष्टीने सर्व
उपक्रमांची सविस्तर माहिती देण्याच्या अनुषंगाने सेतू अभ्यासक्रम उद्घाटन कार्यक्रमानंतर
लगेच उद्ोधन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी कार्यक्रमाचे महत्व लक्षात घेवून आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख,शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी सर्व तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता,अधिव्याख्याता,विषय सहायक,विषय साधन व्यक्ती यांना सदर कार्यक्रमास उपस्थित राहणे.
COMMENTS