राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत 4 Youtube Channels
आपणास माहित आहे की सद्यस्थितीत शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नयेम्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र मार्फत खालील ४ Youtube Channel तयार करण्यात आले आहेत.
![]() |
| SCERTMH YouTube channels |
१) मराठी
माध्यम इ.१ ली ते इ.७ वी
Channel चे नाव :- SCERTMH Marathi Medium Class 1 to
7
२) मराठी
माध्यम इ.८ ते इ. १०वी
Channel चे नाव :- SCERTMH Marathi Medium Class 8 to 10
३) उर्दू
माध्यम इ.१ ते इ.७वी
Channel चे नाव :- SCERTMH Urdu Medium Class 1 to 7
४) उर्दू
माध्यम इ.८ ते इ. १०वी
Channel चे नाव :- SCERTMH Urdu Medium Class 8 to 10
लवरकरच इंग्रजी माध्यम व हिंदी माध्यम यांच्यासाठी देखील Youtube Channel सुरु करण्यात येणार आहेत.
याचसोबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र तर्फे
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी खालील १२ शैक्षणिक
टी.व्ही channel हे जिओ टी.व्ही (जिओ सिम धारक यांना उपलब्ध) वर ज्ञानगंगा या नावाने उपलब्ध करून
देण्यात आले आहेत. महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे ज्याने ४ माध्यमांसाठी शैक्षणिक channel सुरु केले आहेत.
१) ज्ञानगंगा
- इ.१२ विज्ञान
२)
ज्ञानगंगा - इ. १० वी इंग्रजी माध्यम
३) ज्ञानगंगा
- इ.१० वी मराठी माध्यम
४)
ज्ञानगंगा - इ. १० वी उर्दू माध्यम
५) ज्ञानगंगा
- इ.९ वी इंग्रजी माध्यम
६)
ज्ञानगंगा - इ.९ वी मराठी माध्यम
७) ज्ञानगंगा
- इ. ९ वी उर्दू माध्यम
८)
ज्ञानगंगा - इ.८ वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
९) ज्ञानगंगा
- इ.७ वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
१०)
ज्ञानगंगा - इ.६ वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
११)
ज्ञानगंगा - इ.५ वी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम
१२)
ज्ञानगंगा - इ.३ री व ४ थी मराठी, इंग्रजी व उर्दू माध्यम सोबत हिंदी माध्यमाचे
देखील
Channel सुरु होत आहेत.
सदर Channel पाहण्यासाठी जिओ टी.व्ही या APP वर Category मधून Educational निवडा व वरील Channel मधील आपल्याला पाहावयाचा Channel निवडा. सदर जिओ टी.व्ही वर प्रक्षेपित होणारे सर्व व्हिडीओ राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या YouTube Channel वर देखील उपलब्ध होतील. यामुळे केवळ जिओ टी.व्ही साठी जिओचे सीम कार्ड घेण्याची
आवश्यकता नाही.
परिषदेकडून प्रसारीत होणाऱ्या अभ्यासमाला, प्रशिक्षणे, अवांतर वाचनाची
पुस्तके, विविध शासन निर्णय, शाळा, पालक,
विद्यार्थी, शिक्षक यांना आवश्यक असणारी माहिती आपणास तात्काळ आपल्या मोबाईल वर प्राप्त करून घेण्यास राज्य
शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या Jio Chat Channel ला आपण जॉईन व्हावे व आपल्या अधिनस्त अधिकारी,
कर्मचारी, शिक्षक, शाळा, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पालक
यांना कृपया आपण या सुविधेविषयी अवगत करावे व सदर Channel ला जॉईन होण्यास आवाहन करावे. यासाठी
आपल्या स्मार्टफोन मध्ये Jio Chat हे प्ले
स्टोअर, App स्टोअर मधून डाऊनलोड करा, आपला मोबाईल क्रमांक व नाव टाकून App मध्ये नोंदणी करा व Channel मध्ये SCERT, Maharashtra हे channel शोधा व त्याला जॉईन करा अथवा खालील लिंक ला क्लिक करून अथवा खालील QR कोड ला
स्कॅन करून जिओ चाट Channel ला जॉईन करावे.
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group
2) Telegram Channel
3) Facebook Page






If you have any doubts, please let be know.