प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांसाठी संच मान्यता सुधारित निकष

0 Mr. Annasaheb Babar

 प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांसाठी संच मान्यता सुधारित निकष

प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदांसाठी संच मान्यता सुधारित निकष

       राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक संवर्गातील पदे निश्चित करण्यासाठी शासनाने संदर्भाधिन क्र.१ च्या शासन निर्णयान्वये धोरणात्मक निर्णय घेवून त्यानुसार सद्यस्थितीत सन २०१५-१६ पासून शाळांना पदे मंजूर करण्यात येत आहेत.

      संच मान्यतेच्या सदर निकषानुसार शाळांना पदे मंजूर होत नसल्याने संबंधित घटक,लोकप्रतिनिधी, विधिमंडळाचे सन्माननीय सदस्याकडून विधानमंडळामध्ये लक्षवेधी सूचना,प्रश्नोतरे यांच्या माध्यमातून मागणी करण्यात येत आहे. सदर बाब विचारात घेवून शासन निर्णय दि.२८/८/२०१५ मधील मुद्या क्र २.१ ते २.३ वरील तरतुदी सुधारित करण्यासाठी माध्यमिक शाळेसाठी परिशिष्ट-अ व प्राथमिक,उच्च प्राथमिक शाळेसाठी परिशिष्ट-ब मध्ये नमुद केल्यानुसार निकष प्रस्तावित करण्यात येत आहेत.

सदर निकष निश्चित करताना खालील बाबी प्रस्तावित करण्यात येत आहेत.
१. प्राथमिक शाळांतील प्राथमिक ( इ.१ ली ते इ.५वी) व उच्च प्राथमिक (इ.६ वी ते इ.८ वी) या गटातील पदांसाठी केंद्र शासनाच्या दि.२९/८/२००९ मधील राजपत्रातील परिशिष्टामध्ये नमुद केल्यानुसार पदे देण्यासाठी सदर निकष विचारात घेवुन प्रस्तावित करण्यात येत आहेत.

२. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील तरतुदी विचारात घेता ज्या
माध्यमिक शाळा इ.५वी वर्गापासून आहेत त्या शाळांतील इ. ५ वी वर्ग नजीकच्या १ किमी परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्था/खाजगी संस्थेच्या प्राथमिक शाळेस सन २०२१-२२ पासून जोडण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे.

३. माध्यमिक शाळांमध्ये पुर्वी विशेष शिक्षक स्वतंत्रपणे मंजूर करण्यात येते होते त्यानुसार येणारा कार्यभार विचारात घेवून शिक्षकांच्या प्रमाणात विशेष शिक्षक क्रीडा,कला व कार्यानुभव यासाठी प्रस्तावित करण्यात येत आहे.

४. मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षक पदासाठी सध्या असलेल्या निकषामध्ये बदल करण्याचे प्रस्तावित करण्यात येत नाही, सध्या असलेले निकष योग्य आहेत.
५.नव्याने निश्चित होणा-या निकषानुसार सन २०२०-२१ च्या संच मान्यतेनुसार शिक्षक अतिरिक्त होत असले तरी अशा शिक्षकांना शाळांतील विद्यार्थी वाढीसाठी पुढील एक शैक्षणिक वर्षासाठी संधी देण्याबाबत व विद्यार्थी वाढ न झाल्यास सन २०२१-२२ च्या संच मान्यतेनुसार अन्य शाळेत समायोजन करण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे.

. कमी पटसंग्व्येच्या शाळांबाबत पुर्वीच्या तरतुदीनुसार सरासरी उपस्थिती झाल्याम अनुदान बंद करणे अथवा शिक्षार्थ कपात करण्याची तरतुद होती. सदर तरतुदी विचारात घेता प्रत्येक वर्गाची सरासरी पटसंख्या खाजगी अनुदानित प्राथमिक शाळेतील-१५, खाजगी अनुदानित प्राथमिकसह उच्च प्राथमिक वर्ग असणा-या शाळेत-२० व खाजगी अनुदानित माध्यमिक शाळेतील-२५ या पेक्षा कमी असल्यास व अनुक्रमे १,३ व ५ किमी परिसरात संबंधित प्रकाराची शाळा असल्यास अशा शाळांतील स्थायी शिक्षकांचे पदासह समायोजन अन्य शाळांमध्ये करुन व्यवस्थापनांस सदर शाळा पुढे चालवावयाची असल्यास सदर शाळा स्वयंअर्थ सहाय्यित तत्वावर पुढे चालु ठेवण्यास परवानगी देणेबाबत कार्यवाही करणे व यासाठी शाळांना पटसंख्या वाढविण्यास २ शैक्षणिक वर्ष म्हणजेच सन २०२१-२२ व सन २०२२-२३ साठी संधी देण्याबाबत प्रस्तावित करण्यात येत आहे.

७. यासोबतच्या परिशिष्टामध्ये नमुद करण्यात आलेल्या निकषानुसार पदे ही शासनाने वेळोवेळी मंजूर केलेल्या पदसंख्येच्या मर्यादेत देय होत आहेत.

८. सन २०१९-२० या वर्षाच्या संच मान्यता झालेल्या नाहीत व आता शैक्षणिक वर्ष २०२०-२१ सुरु झाल्यामुळे सन २०१८-१९ या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेली पदेच सन २०१९-२० विचारात घेवून सुधारित निकष सन २०२०-२१पासून लागू करणे आवश्यक राहील.


********************************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group

2) Telegram Channel

3) Facebook Page
Tag-  online study app,online study board,online study class,online study class ,online study class 5,online study class 8,online study home,online study in lockdown,online study india,online study kaise kare class 10,online study link,online study 



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close