महाकरिअर पोर्टल प्रशिक्षणासाठी वेबिनार | MahaCareer Portal Training

0 Mr. Annasaheb Babar
महाकरिअर पोर्टल प्रशिक्षणासाठी वेबिनार 
        राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र,पुणे व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यामध्ये इ ९ वी ते इ १२ वी च्या विद्यार्थ्याना करिअरच्या विविध पर्यांची माहिती उपलब्ध करुन देण्यासाठी महाकरिअर पोर्टल सुरु करण्यात आलेले आहे.

         सदर महाकरिअर पोर्टल कसे वापरावे याचे प्रशिक्षण सर्वाना देण्यासाठी तसेच पोर्टल संदर्भात इतर तांत्रिक माहिती विद्यार्थी, शिक्षक व पालक,शासकिय, जिल्हा परिषद,महानगर पालिका,नगर परिषद,खाजगी अनुदानित, माध्यमिक शाळा /ज्युनि.कॉलेज यांना व्हावी याकरीता खालील प्रमाणे प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात आलेले आहे. आपल्या विद्यालयातील इ ९ वी ते १२ वी मधील सर्व विद्यार्थ्याना  तसेच इ ९ वी व इ १० मधील १ शिक्षक व इ ११ वी व इ १२ वी मधील १ शिक्षक असे दोन शिक्षकांना वेबिनारच्या सत्रास दुपारी ३.०० ते ४.०० या वेळेत उपस्थित राहण्यासाठी आपल्यास्तरावरुन सूचित करण्यात यावे. सदर वेबिनार YouTube च्या माध्यमातून देखील Live प्रक्षेपित करण्यात येणार असल्याने यापेक्षा जास्त शिक्षक देखील उपस्थित राहू शकतील.

 विषय १: महाकरिअर पोर्टलवर करिअरची माहिती कशी मिळवायची.
 तारिख व वेळ
 वेबिनार दि ३१ ऑगष्ट २०२० वार सोमवार
 वेळ दुपारी ३.०० ते ४.००

 वेबिनार लिंक (YouTube)


महाकरिअर पोर्टल प्रशिक्षणासाठी वेबिनार पहा

Live


********************************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group

2) Telegram Channel

3) Facebook Page


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close