इयत्ता ११वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया २०२०-२१ | Class 11th Central Online Admission Process 2020-21
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील इयत्ता ११वी केंद्रीय
ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत परिपूर्ण माहिती देणारी ही
माहितीपुस्तिका डिजीटल स्वरूपात आपल्या हाती सोपविताना खूप आनंद होत आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वप्रथम पुणे शहर परिसरात इ. ११वीची
प्रवेश प्रक्रिया सन १९९६-९७ पासून केंद्रीय पद्धतीने सुरू करण्यात आली.
सन २००९-१० पासून मुंबई महानगर (MMR)
क्षेत्रात प्रथमच इ.११वी
चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन
पद्धतीने सुरू करण्यात
आले. त्यानंतर सन २०१४-१५ पासून मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
क्षेत्रात इ. ११वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येऊ
लागले.
सन २०१७-१८ पासून मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्यातील मुंबई
महानगर क्षेत्र (MMR), पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
क्षेत्रांसोबतच नागपूर, अमरावती, नाशिक व औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रातहीइयत्ता
अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहेत.
यापूर्वीच्या ऑफलाईन प्रवेश पद्धतीने
विदयार्थ्यांना अर्ज भरणे व प्रवेशाबाबत इतर माहिती जाणून घेण्यासाठी वारंवार
संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये अथवा स्वीकृती केंद्रावर जावे लागत होते.
त्याऐवजी त्यांना आता आपला प्रवेश अर्ज स्वत:च्या घरामधून ऑनलाईन
पद्धतीने सादर करता येईल. त्यामुळे इयत्ता ११वीमध्ये प्रवेश घेऊ
इच्छिणाऱ्या सर्व विदयार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे श्रम, पैसा व वेळ वाचणार
आहे. 'राज्यस्तर प्रवेश नियंत्रण
समिती' च्या
वतीने संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्यामार्फत संपूर्ण प्रवेश प्रक्रिया
पारदर्शक पद्धतीने राबविली जात आहे.
सदर प्रवेश प्रक्रिया
अधिकाधिक सुलभ व 'विद्यार्थीकेंद्री' होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी शासन निर्णय
निर्गमित केलेले आहेत.
ऑनलाईन प्रवेश
प्रक्रियेसाठी मा. ना. वर्षा गायकवाड, मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र
राज्य; मा. ना. बच्चू
कडू, राज्य मंत्री, शालेय शिक्षण, महाराष्ट्र
राज्य यांची प्रेरणा, मा. श्रीमती वंदना कृष्णा, अपर मुख्य सचिव, शालेय शिक्षण
व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन; मा. श्री. विशाल सोळंकी, आयुक्त (शिक्षण),
महाराष्ट्र राज्य, पुणे, यांचे
मार्गदर्शन; तसेच सर्व
समिती सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
राज्यातील सहा महसुली
विभागांच्या मुख्यालयी (मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर) महानगरपालिका
क्षेत्रांमध्ये सर्व उच्च माध्यमिक विद्यालयांमधील प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश
प्रक्रियेद्वारे करण्यात येत आहेत. त्यासाठी https://11thadmission.org.in
हे संकेतस्थळ तसेच
क्षेत्रनिहाय स्वतंत्र संकेतस्थळे निर्माण करण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांनी, आपणास ज्या क्षेत्रात प्रवेश घ्यावयाचा आहे त्या संकेतस्थळाचा
वापर करावा. त्यासोबतच यावर्षीपासून आपल्या हाती मोबाईल ॲप दिले जाणार आहे
ज्यामुळे प्रवेश प्रक्रिया आणखी सुलभ होईल.
इ. ११वी व १२वी हा उच्च
माध्यमिक स्तर म्हणजे पुढील महाविद्यालयीन शिक्षणाची पायाभरणी असणार
आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यास त्याच्या भविष्याचा मार्ग/Career निवडण्यास मदत करावी व
संकेतस्थळावर अथवा संक्षिप्त संदेशाद्वारे (SMS) वेळोवेळी
देण्यात येणाऱ्या सूचनांचे नियमित अवलोकन
करावे. संबंधित शाळा व
महाविद्यालये विद्यार्थ्यांना आवश्यक सहकार्य करतीलच. या प्रवेश प्रक्रियेतील
प्रत्येक घटकास सुलभ होईल अशी कार्यपद्धती अवलंबिण्याचा शासनाचा
प्रयत्न आहे.
सध्या, शासनाने विहित
केलेल्या सहा ऑनलाईन प्रवेश क्षेत्रांमधील महाराष्ट्र राज्य मंडळाशी संलग्न उच्च
माध्यमिक विद्यालयातील प्रवेश ह्या प्रवेश प्रक्रियेद्वारे करण्यात येणार आहेत.
अन्य मंडळाच्या उच्च माध्यमिक विद्यालयांमधील प्रवेश प्रचलित
पद्धतीनुसार शाळास्तरावरून करण्यात येतील. तथापि, इतर मंडळांच्या
विदयार्थ्यांनाही ह्या प्रक्रियेद्वारे राज्य मंडळाच्या उच्च माध्यमिक
विद्यालयामध्ये प्रवेश घेता येतील.
सर्वांनी पुस्तिकेत
दिलेल्या सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करून प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्यावी.
कोरोना विषाणू अर्थात Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे माणसाने माणसास भेटणे धोक्याचे
ठरत आहे.याचा विचार करून यावर्षी आपणास Physical
Distance चे पालन करून सर्व प्रवेश
प्रक्रिया पूर्ण करता येईल
अशी व्यवस्था केलेली आहे.
आपला मोबाईल फोन, संगणक हेच आपले खरे मदतनीस ठरणार आहेत.
या माहितीपुस्तिकेचे दोन
भाग आहेत भाग-एक मध्ये, सर्वसाधारण माहिती आणि भाग-दोन मध्ये संबंधित
क्षेत्रातील मार्गदर्शन केंद्रांची यादी व संपर्क क्रमांक देण्यात आलेले आहेत.
विदयार्थ्यांना साहाय्य करण्यासाठी त्या त्या परिसरात मार्गदर्शन
केंद्र स्थापन करण्यात आलेली आहेत. तसेच मोफत हेल्पलाईन चालविण्यात
येत आहे त्याचा लाभ घ्या. त्याचप्रमाणे आपल्या सुविधेसाठी ही पुस्तिका इंग्रजी व
मराठी अशा दोन्ही माध्यमांतून प्रकाशित करण्यात येत आहे.
ऑनलाइन प्रवेश क्षेत्र व संकेतस्थळे
१) मुंबई महानगर क्षेत्र (MMR)
२) पुणे, पिंपरी-चिंचवड मनपा
३) नागपूर
महानगरपालिका
४) अमरावती
महानगरपालिका
५) नाशिक
महानगरपालिका
६) औरंगाबाद महानगरपालिका
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group
2) Telegram Channel
3) Facebook Page
Tag-
11th admission 2020 maharashtra,11th admission process,11th admission form,11th admission date 2020,11th admission process 2020,11th admission form kaise bhare 2020,11th admission online,11th admission part 2 form,11th admission apply,11th admission abp news,11th admission apply online,11th admission aurangabad 2020-21,11th admission booklet,online admission 11th class 2020,
11th class admission 2020,11th admission date


If you have any doubts, please let be know.