सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड; जीन्स टी-शर्टवर बंदी

  सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड; जीन्स टी-शर्टवर बंदी

सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड; जीन्स टी-शर्टवर बंदी


  • 👕सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. कार्यालयात कामकाज करणारे बरेचसे आधिकारी, कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थीत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना अनुरुप ठरेल अशा वेशभूषेचा वापर करीत नाहीत.

 

  • त्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची जनमानसातील प्रतिमा मलीन होते. मंत्रायलय तसेच सर्व राज्य सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा कार्यालयातील दैनंदिन पेहराव कशा पद्धतीचा असावा याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

 

  • गडद रंगांचे चित्रविचित्र नक्षीकाम/चित्रे असलेले पेहराव परिधान करू नयेत. तसेच सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीन्स टी-शर्टचा वापर कार्यालयामध्ये करू नये.

 

  •  खादीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा (शुक्रवारी) खादी कपड्याचा पेहराव परिधान करावा.

 

  • महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयामध्ये शक्यतो चपला, सॅन्डल, बूट (शूज) यांचा वापर करावा तसेच पुरुष अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बूट (शूज), सॅन्डल याचा वापर करावा.

 

  • कार्यालयामध्ये स्लिपरचा वापर करू नये.


********************************************

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.

1) WhatsApp Group (New Update)

2) Telegram Channel

3) Facebook Page

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close