रणजितसिंह डिसले गुरुजी कोण आहेत?
सोलापूर
जिल्हा परिषदेच्या परीतेवाडी शाळेत रणजितसिंह डिसले शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना माहिती
तंत्रज्ञान आणि क्यूआर कोडच्या सहाय्याने शिकवण्यासाठी डिसले प्रसिद्ध आहेत. त्यांनी
माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन, शिकवण्याचे नवे तंत्र विकसित केले आहे; तसेच इतर शिक्षकांनाही टेक्नोसॅव्ही
होण्यासाठी प्रेरीत केले आहे. आयटीच्या प्रभावी वापरासाठी त्यांनी स्वतःची छोटेखानी
प्रयोगशाळा उभारली आहे. त्याचप्रमाणे लॉकडाउनमध्येही तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा
प्रभावी वापर करुन विद्यार्थ्यांना शिकवले.
जे शिक्षण फक्त शाळेतच मिळू शकते, ते विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची अभिनव कल्पना रणजितसिंह डिसले यांना पाच वर्षांपूर्वी सुचली आणि त्यांनी ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सतत प्रयत्न केले, हे विशेष. त्यांच्या या कल्पनेला राज्यातल्या सरकारने मदत केली आणि हीच कल्पना देश पातळीवरही राबवण्यास सुरुवात केली, हे तर अधिकच कौतुकास्पद. पाठय़पुस्तकातल्या प्रत्येक धडय़ाला एक स्वतंत्र जलद प्रतिसाद संकेत (‘क्यूआर’ किंवा क्विक रिस्पॉन्स कोड) दिल्यामुळे कोणालाही शाळेबाहेर कुठेही आणि केव्हाही तो धडा श्राव्य किंवा दृक्-श्राव्य माध्यमातून समजून घेणे सोपे झाले. धडा असा समजून घेतला की मग त्याबद्दलची प्रश्नपत्रिकाही त्याच पद्धतीने मिळू लागली आणि शिक्षणच मुलामुलींच्या घरापर्यंत जाऊन पोहोचले. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी तर ही एक सहजप्राप्य युक्ती होती. रणजितसिंह डिसले यांनी या पद्धतीने सोलापूर जिल्ह्य़ातील तीनशेपेक्षा जास्त शाळांमध्ये या जलद प्रतिसाद संकेताचा उपयोग करून वंचित विद्यार्थ्यांना शिकण्याचे समाधान मिळवून दिले.
मागील 11 वर्षापासून कार्यरत असणारे डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगामुळे जगभर ओळखले जातात डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशातील दहा कोटीहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धती च्या माध्यमातून ते 150 हून अधिक देशातील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात.
असे हे रणजितसिंह डिसले गुरुजी...
शिक्षक दिनः मुलांना QR कोड पध्दतीचा वापर करून शिकवणारे रणजीत डिसले #TeachersDay2019 #शिक्षक_दिवस pic.twitter.com/GVfk2EdzGQ
— BBC News Marathi (@bbcnewsmarathi) September 5, 2019
पुरस्कार स्वरूप काय आहे ?
युनेस्को आणि लंडनमधल्या वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने
दरवर्षी ग्लोबल टीचर पुरस्कार देण्यात येतो.
या पुरस्कारासाठी जगभरातून तब्बल 12 हजार नामांकनं दाखल झाली
होती. त्यापैकी 10 शिक्षकांना अंतिम यादीत स्थान मिळालं. त्यात रणजितसिंह डिसले यांचंही
नाव होतं.
या पुरस्काराची रक्कम 1 मिलियन अमेरिकन डॉलर्स म्हणजे 7 कोटी
रुपयांहून अधिक आहे. डिसले यांनी यातली निम्मी रक्कम इतर 9 शिक्षाकांमध्ये वाटप करण्याचं
ठरवलं आहे.
डिसले यांच्यासोबतच इटली, ब्राझिल,
व्हिएतनाम, मलेशिया, नायजेरिया,
दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, अमेरिका आणि यूकेमधील शिक्षक हे या यादीतल्या
टॉप 10 मध्ये होते. डिसले यांच्या निर्णयामुळे या शिक्षकांना प्रत्येकी जवळपास 40 लाख
रुपये मिळणार आहेत.
"माझ्या मते अंतिम यादीतल्या सगळ्या शिक्षकांकडं एकसारखीच
गुणवत्ता आहे. मी फक्त एक निमित्त आहे. दुसरं म्हणजे 10 शिक्षक जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये
मुलांच्या शिक्षणासाठी ही रक्कम वापरतील तेव्हा मोठा बदल घडेल," असं रणजितसिहं डिसले यांनी बीबीसी मराठीशी
बोलताना सांगितलं.
लंडनमधल्या नॅचरल हिस्ट्री म्युझिअममध्ये या पुरस्काराचं वितरण
झालं. त्यावेळी हॉलीवुडचे सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी डिसले यांच्या नावाची
घोषणा केली.
************************************************
If you have any doubts, please let be know.