दहावीचे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व प्रकल्प यांचे मूल्यमापन कसे करावे ? | How to evaluate Practical, Grade, Oral Examination and P...
दहावीचे प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व प्रकल्प यांचे मूल्यमापन कसे करावे ? | How to evaluate Practical, Grade, Oral Examination and Project of SSC?
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे-०४
कोविड-१९
विषाणूच्या प्रादूर्भाबाच्या पार्श्वभूमीवर आयोजित माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षा एप्रिल-मे २०२१
मुख्याध्यापकांसाठी मार्गदर्शक सूचना
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा
,प्रकल्प, इ.
१. अ) कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर इयत्ता १० वीची विज्ञान विषयाची प्रात्यक्षिक परीक्षा मंडळाच्या प्रचलित पध्दतीने घेतली जाणार नाही. त्याऐवजी
प्रात्यक्षिकांवर आधारित विशिष्ट लेखनकार्य (Assignments),
प्रकल्प, प्रात्यक्षिक वही व गृहपाठ यांचा समावेश
असेल. याचा विषयनिहाय तपशील परिशिष्ट -अ मध्ये देण्यात
आलेला आहे. सदरचे प्रात्यक्षिकांवर आधारित कार्य लेखी परीक्षेनंतर दिनांक २१/०५/२०२१ ते दिनांक १०/०६/२०२१
या कालावधीत विद्यार्थ्याकडून जमा करुन घेण्यात यावे.
प्रात्यक्षिक वही जमा
करण्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यास कोविड-१९ विषाणूची लागण झाली असल्यास अथवा त्रास होत असल्यास प्रात्यक्षिक वही जमा करण्यास आणखी १५ दिवसापर्यंत मुदतवाढ देण्यात यावी.
ब) श्रेणी, तोंडी परीक्षा व इतर
अंतर्गत मूल्यमापन इत्यादी घेण्याचे स्वातंत्र्य संबंधित माध्यमिक शाळांना देण्यात येत आहे. यासाठी अंतर्गत व बहिस्थ परीक्षक
संबंधित माध्यमिक शाळांतूनच देण्यात यावे.
२.दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कार्यशिक्षण/शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र व गृहशास्त्र विषयाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक २१/०५/२०२१ ते दिनांक ०१/०६/२०२१ या कालावधीत आयोजित करण्यात याव्यात. कोविड-१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यासाठी हा कालावधी दिनांक १०/०६/२०२१ पर्यंत वाढविण्यात यावा. दिव्यांगासाठी प्रात्यक्षिक परीक्षेऐबजी प्रात्याक्षिकांवर आधारित विशेष लेखन कार्यादवारे मूल्यमापन करण्यात यावे. याबाबत संबंधित शाळेला स्वातंत्र्य देण्यात येत आहे.
३. शाळेत येणाऱ्या सर्व घटकांनी कोविड-१९ विषाणू
प्रादुर्भावाच्या अनुषंगाने शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.
४. उपरोक्त कालावधीत शाळांमध्ये पिण्याच्या
पाण्याची व सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. तथापि, अधिक सुरक्षिततेच्या दृष्टीने विद्यार्थ्यानी
परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी येताना स्वतःचीपाण्याची बाटली व सॅनिटायझर छोटी
बाटली सोबत ठेवण्याबाबत तसेच स्वतःचा मास्क व स्वतःचे लेखन साहित्य (उदा-पेन, पेन्सिल, कंपास इ. ) सुद्धा स्वतःसोबत आणावे व त्याचाच
बापर करण्याबाबत आपल्या स्तरावरुन विद्यार्थ्यांना
सूचित करावे.
५. प्रात्यक्षिक वही शाळेमध्ये जमा करताना विद्यार्थी
व अन्य संबंधित घटकांकडून गर्दी टाळण्याच्या दृष्टीने आरोग्यविषयक सर्व सूचनांचे पालन होईल असे पहावे. विद्यार्थ्यांना
शाळेत प्रवेश देताना त्यांचे तापमान घेऊन त्यांना टप्प्याटप्प्याने (बॅचेस
पध्दतीने) प्रवेश देण्यात याबा. शाळेमध्ये प्रवेश करताना व शाळेतील संपूर्ण कालावधीत मास्क वापरणे विद्यार्थी व सर्व घटकांना
अनिवार्य राहील.
६. विद्यार्थी व सर्व संबंधित घटकांना वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर
करण्याबाबत सूचित करावे. शाळेमध्ये कोणत्याही प्रकारे गदी होणार नाही व शारीरिक
अंतर राखले जाईल याची दक्षता शाळेने घ्यावी. प्रात्यक्षिक वही
जमा केल्यानंतर विद्यार्थी त्वरित शाळेचे आवार सोडतील असे पहावे.
७. शाळेच्या आवारातील कचरा कुंडया झाकून ठेवाव्यात.
८. स्वच्छतागृह वेळोवेळी निर्जतूंकीकरण करुन घ्यावीत.
९. प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प इ. परीक्षेच्या
कालावधीत शाळेच्या आवारामध्ये पालकांना प्रवेश देऊ नये.
१०. प्रात्यक्षिक,श्रेणी, तोंडी परीक्षा,
प्रकल्प इ. परीक्षेच्या कालावधीत
शाळेच्या आवाराबाहेर पालकांनी गर्दी करु नये यासाठी योग्य ती खबरदारी
घ्यावी.
११. कोविड -१९ विषाणूच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचा
परीक्षेचा ताण-तणाव कमी करण्याच्या
अनुषंगाने विद्यार्थी/पालक
यांना वारंवार येणाऱ्या शंकाची (FAQ) उत्तरे राज्यमंडळाच्या संकेतस्थळावर प्रश्नोत्तरांच्या
स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे याबाबतची माहिती विद्यार्थी व पालक यांच्या
निदर्शनास आणून दयावी.
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा , प्रकल्प, इ.
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.
COMMENTS