९ वी व ११ वी चे मूल्यमापन संदर्भात मार्गदर्शक सुचना | Guidelines regarding evaluation of 9th and 11th
१. कोरोनाच्या अपवादात्मक परिस्थितीचा विचार करता राज्य मंडळाझी संलग्न असलेल्या राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या, सर्व माध्यमाच्या, सर्व शाळांमधील इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना पुढील वर्गात वर्गोन्नती देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.
२. कोरोनाच्या
अपवादात्मक परिस्थितीचा विचार करून माध्यमिक शाळा संहितेमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी
आपल्या स्तरावर विषय शिक्षकांच्या समितीचे गठन करून इ. ९ वी व इ.११ वी मधील विद्यार्थ्यांचे शाळेने आयोजित केलेल्या चाचण्यांमधील, प्रात्यक्षिकांमधील, अंतर्गत मूल्यमापनातील अथवा विद्यार्थ्यांना
विषयनिहाय चाचण्या/ ट्युटोरिअल घरी सोडविण्यास देऊन अथवा कोणत्याही सोयीच्या मूल्यमापन तंत्राचा वापर करून त्याआधारे विद्यार्थ्यांना
गुणांकन देण्याचा निर्णय शाळास्तरावर/ कनिष्ठ महाविद्यालय
स्तरावर / उच्च माध्यमिक विद्यालय स्तरावर घेण्यात यावा. मात्र असे करत असताना इयत्ता
९ वी व इयत्ता ११वीच्या सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचे बंधन शाळांवर राहील.
३. इयत्ता९वीव इयत्ता ११वीच्या विद्यार्थ्याच्या गुणपत्रिकेवर
वेगळ्या सत्र नोंदी न करता सदर समितीने विचारात घेतलेल्या मूल्यमापन साधनामधील विषयनिहाय
प्राप्त गुणांचा उल्लेख करून प्रचलित पद्धतीने गुणपत्रक तयार करावे.
If you have any doubts, please let be know.