शिक्षक बांधवांसाठी व सर्वांसाठी उपयुक्त असणाऱ्या सात वेबसाईट्स
मी शिक्षक बांधवांसाठी व इतर सर्वांसाठी सात उपयुक्त
वेबसाइटची लिंक देत आहे. त्या वेबसाईटचा उपयोग करुन आपण आपल्याला आवश्यक असणारी आकृती
काढू शकतो, एखादी खराब झालेली इमेज ती पूर्ववत करू शकतो, एखादा जुना ब्लॅक अँड व्हाईट
फोटो आपण रंगीत करू शकतो, एखाद्या इमेजची बॅकग्राऊंड काढू शकतो व बदलू शकतो, माहिती टाईप करून वेळ जातो त्या ऐवजी बोलून जर टायपिंग
केलं तर वेळेत आपण टायपिंग पूर्ण करू शकतो, एखाद्या लिहिलेल्या पेजचा फोटो काढला असता
त्याचे रूपांतर वर्ड टेक्स्ट मध्ये करू शकतो म्हणजेच टायपिंग चा वेळ आपणाला वाचवता
येतो आणि शेवट ची वेबसाईट आहे फोटो कट करणे किंवा आवश्यक ते बदल करणे अशा तर्हेने
एकूण सात वेबसाईट आपल्याकडे सेव्ह मध्ये ठेवा आणि त्याचा वापर योग्य त्या ठिकाणी करा.
1) AutoDraw
यामध्ये आपण कच्ची आकृती किंवा एखादी कच्ची डिझाईन
काढले असता ती पक्की डिझाईन आपणाला ऑटोमॅटिक करून दिली जाते. त्याच्यामध्ये आपण रंग
भरू शकतो आणि ते चित्र आपण डाऊनलोड करून आपणाला आवश्यक त्या ठिकाणी वापरता येते.
*********************************************
2) Restore pictures: remove scratches, sharpen colors, and enhance faces
या वेबसाईटचा उपयोग करुन आपण आपल्याकडे असलेले जुने
फोटो किंवा फाटलेले, तुटलेले जोडून तयार केलेले फोटो व्यवस्थित रित्या मूळ फोटो सारखे
आपल्याला बनवून मिळते. खालील प्रमाणे पूर्वी चा फोटो व नंतर चा फोटो कसा तयार होतो
हे आपल्याला पाहता येईल.
*********************************************
3) Colorize pictures: turn black and white photos to color
या वेबसाईटचा उपयोग करुन आपल्याकडे असणारे ब्लॅक
अँड व्हाईट फोटो आपण रंगीत करू शकतो. पूर्वीचे जुने रंगीत नसलेले फोटो आपणाला रंगीत करून या ठिकाणी
घेता येते.
*********************************************
4) Remove Bachground
या वेबसाईटच्या मदतीने
फोटोच्या मागील बॅकग्राऊंड आपणाला काढता येईल व ती चेंज सुद्धा करता येईल. नको असलेले
बॅकग्राऊंड काढून आपणाला योग्य असलेली बॅकग्राऊंड घेता येते.
*********************************************
5) Voice Notepad - Speech to Text with Google Speech Recognition
ह्या वेबसाईट च्या साह्याने
आपण बोलून टायपिंग करू शकतो. कमी वेळामध्ये आपण लेखन करून योग्य अशी माहिती आपण तयार
करू शकतो.
*********************************************
6) Text Image convert to word text
या वेबसाईटच्या साह्याने
आपण एखादी टेक्स्ट इमेज चा उपयोग करून त्यावरील माहिती आपण वर्ड टेक्स्ट मध्ये रूपांतरित
करू शकतो. म्हणजेच आपण मोबाईल वरती एखाद्या पेज चा फोटो काढला तर त्यामध्ये शाब्दिक
माहिती आपण वर्ड मध्ये कन्व्हर्ट करू शकतो.
*********************************************
7) Online Photo Editor
या वेबसाईट च्या साह्याने
आपण ऑनलाइन फोटो क्रॉप, कलर किंवा आपल्याला हवे तसे बदल करून घेऊ शकतो.
If you have any doubts, please let be know.