राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१ - २०२२

 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२१ - २०२२ 

 

संपूर्ण जगभर उद्भवलेल्या कोविड-१९ या महामारीच्या काळातही सर्व मुलांचे शिक्षण सुरु राहावे यासाठी सर्वत्र प्रयत्न होत आहेत. याचबरोबर राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी विद्यार्थ्यांच्या अध्ययनात खंड पडू नये यासाठी नवनवीन उपक्रम तसेच कल्पनांचा वापर करत आहेत. तसेच प्रत्येक मूल प्रगत होण्यासाठी शिक्षक व अधिकारी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती राज्यातील शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांना व्हावी तसेच सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या नवोपक्रमशीलतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत सन २०२१-२२ या वर्षासाठी राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.

ही स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. सृजनात्मक कार्याची आवड असणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षक व अधिकाऱ्यांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेची उद्दिष्टे :

१.प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तरावरील अध्ययन अध्यापनात सुधारणा घडवून आणण्यासाठी शिक्षक व अधिका-यांना प्रोत्साहन देणे.

२.शिक्षक व अधिका-यांनी दैनंदिन कामकाजात नाविन्यता आणण्यासाठी प्रोत्साहन देणे.

३.प्राथमिक ते उच्च माध्यमिक स्तर तसेच डी.एल.एड. विद्यालय ते प्रशासन यामध्ये गुणवत्तेच्या दृष्टीने शिक्षण क्षेत्रात नवनवीन संकल्पना, विचारप्रवाह, तंत्रे आणि अध्ययन अध्यापन पद्धती यांचा निरंतर शोध घेणा-या शिक्षक व अधिका-यांना उत्तेजन देणे.

४.शिक्षक, अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिका-यांमधील सृजनशीलता व संशोधक वृत्ती वाढीस लावणे.

५.शिक्षण क्षेत्रामध्ये विविध विषयांवर केलेले उपयुक्त नाविन्यपूर्ण नवोपक्रम इतर शिक्षकांच्या व शैक्षणिक प्रशासनाच्या माहितीसाठी online प्रकाशित करणे

नवोपक्रम अहवाल लेखन मुद्दे:

नवोपक्रम अहवाल लेखन पुढील मुद्यांच्या आधारे करावे.

१.नवोपक्रमाचे शीर्षक - उपक्रमाचे नेमके नाव लिहावे.

२.नवोपक्रमाची गरज व महत्त्व - उपक्रम निवडण्याचे कारण, उपक्रमाचे वेगळेपण, उपयुक्तता इ.चा तपशील.

३.नवोपक्रमाची उद्दिष्टे - हा उपक्रम मी का करतो आहे, उपक्रमाचा फायदा कोणाला? कसा,कोणत्या स्वरुपात, कोणत्या कृतीमुळे होणार? या उपक्रमातून काय व कोणासाठी साध्य होणार,याबाबत ३ ते ५ विधानात्मक उद्दिष्टे मांडावीत.

४.नवोपक्रमाचे नियोजन -

i) उपक्रमपूर्व स्थितीचे निरीक्षण

ii) संबंधित व्यक्तींशी, तज्ज्ञांशी चर्चा

iii) आवश्यक साधनांचा विचार

iv) करावयाच्या कृतींचा क्रम

v) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण

vi) कार्यवाहीचे टप्पे (वेळापत्रक)

vi) उपक्रमासाठी इतरांची मदत

viii) उपक्रमासाठी सादर करावयाचे पुरावे.

५.नवोक्रमाची कार्यपद्धती -

I) पूर्वस्थितीची निरीक्षणे व त्यांच्या नोंदी II) कार्यवाहीदरम्यान निरीक्षणे व माहिती संकलन

III) उपक्रम पूर्ण झाल्यावर निरीक्षणे व त्यांच्या नोंदी

IV) कार्यवाहीत आलेल्या अडचणी

V) माहितीचे विश्लेषण : आलेख, तक्ते (आवश्यक वाटल्यास)

६.नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पत्ती (उद्दिष्टानुसार) या उपक्रमातून कोणासाठी व काय सध्या झाले, याबाबतची मांडणी यात करावी. उद्दिष्टनिहाय फलश्रुती लिहावी. आवश्यकता वाटल्यास त्याकरिता शेकडेवारी व आलेखाचा वापर करता येईल. अन्यथा वर्णनात्मक विधाने करावी. त्याचप्रमाणे आपण उपक्रमांतर्गत केलेल्या विविध कृतींची फलश्रुती मांडवी.

 

७.समारोप - आपली अस्वस्थता उपक्रमानंतर कशी दूर झाली व उपक्रमाचा उपयोग गुणवत्ता वाढीकरिता कसा झाला, हे विशद करावे.

८.संदर्भसूची व परिशिष्टे - नवोपक्रम करताना ज्या संदर्भग्रंथांचा वापर केला, त्यांची सूची द्यावी तसेच सहभागी वर्गातील विद्यार्थी व आवश्यकता असल्यास त्यांच्यासाठी तयार केलेली पूर्वचाचणी, उत्तर चाचणी, प्रश्नावली इ. जे असेल ते परिशिष्टामध्ये जोडावे.

स्पर्धेसाठी पात्रतेच्या अटी

१.स्पर्धेत भाग घेणारे स्पर्धक हे जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगर पालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये अथवा मान्यता प्राप्त प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. १ली ते १२वीला अध्यापन करणारे असावेत. माध्यमिक शाळांमधील इ. ६वी ते ८वी ला शिकवणारे शिक्षक प्राथमिक स्तर स्पर्धेसाठी गणले जातील.

२.राज्यातील ICDS विभागाच्या अधिनस्थ अंगणवाडीतील कार्यकर्ती/ सेविका व पर्यवेक्षिका या स्पर्धेसाठी भाग घेऊ शकतील.

३.डी.एल.एड. विद्यालयातील अध्यापकाचार्य व शिक्षणक्षेत्रातील पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी (शिक्षण), गटशिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, अधिव्याख्याता, जेष्ठ अधिव्याख्याता) या स्पर्धेत भाग घेऊ शकतील.

४.स्पर्धक सध्या SCERT/ प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA)/ DIET मध्ये विषय सहाय्यक / DIET अंतर्गत विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असावा.

स्पर्धेचे नियम

नवोपक्रम स्पर्धेचे नियम खालील प्रमाणे :

१.राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा वर्षातून एकदाच घेण्यात येईल.

२.स्पर्धकाने सादर करीत असलेला नवोपक्रम यापूर्वी या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी सादर केलेला नसावा. त्यासाठी स्पर्धकाने स्वघोषित प्रमाणपत्र सादर करावे. (प्रमाणपत्राचा नमुना सोबत दिला आहे.)

३.नवोपक्रम शिक्षकांनी स्वतः राबविलेला असावा.याबाबतीत शिक्षकांनी नवोपक्रमाच्या प्रकल्प अहवाला समवेत खालील नमुन्यात प्रतिज्ञापत्र व प्रमाणपत्र ऑनलाईन अपलोड करणे आवश्यक आहे.

 

४.सादर करण्यात आलेला नवोपक्रम पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना / मुलांना उपयुक्त ठरणाऱ्या कोणत्याही विषयावरील असावा. या स्पर्धेसाठी कृतिसंशोधन व लघुसंशोधन पाठवू नये.

५.नवोपक्रम लेखन मराठी, इंग्रजी किंवा हिंदी यांपैकी कोणत्याही एका भाषेत लिहिलेला असावा.

६.नवोपक्रम टाईप केलेला असावा.टाईपिंग साठी Unicode या Font चाच वापर करावा. फॉन्ट साईझ १२, पेज मार्जिन डावी बाजू दीड इंच व उजवी बाजू, वरील बाजू, तसेच खालच्या बाजूस प्रत्येकी 1 इंच मार्जिन/समास असावा.

७.हस्तलिखित करून स्कॅन केलेला नवोपक्रम स्पर्धेसाठी ग्राह्य धरला जाणार नाही.

८.सादर करण्यात आलेला नवोपक्रम हा सन २०२०-२१ किंवा २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेला असावा.

९.नवोपक्रम अहवाल शब्द मर्यादा ४००० ते ५००० असावी. फाईल मध्ये नवोपक्रमाशी निगडीत जास्तीत जास्त 5 फोटोंचा समावेश अहवाल लेखनात करावा.

१०.नवोपक्रम फाईल PDF स्वरूपात जोडावी. PDF फाईल 5 MB पेक्षा जास्त नसावी.

११.स्पर्धकाने आपल्या नवोपक्रमाशी निगडीत इतरांना उपयुक्त होईल असा व्हिडिओ अथवा youtube वर असलेली लिंक नवोपक्रम स्पर्धेच्या लिंक वर विहित ठिकाणी नोंदवावी.

१२.जिल्हा स्तरावर प्रथम पाच क्रमांक निश्चित करण्यासाठी नवोपक्रमास प्रत्यक्ष भेट दिली जाणार आहे. तर राज्यस्तरावर प्रथम १० क्रमांकांच्या स्पर्धकांना आपापल्या नवोपक्रमाचे सादरीकरण करणे बंधन कारक असेल.

१३.राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत पारितोषिके व उत्तेजनार्थ बक्षीस पात्र स्पर्धकांनी आपल्या नवोपक्रम अहवालाची एक प्रत संशोधन विभागाकडे कार्यक्रमाच्यावेळी सादर करणे बंधन- कारक राहील.

१४.राज्यस्तरावरील प्रत्येक गटातील प्रथम दहा क्रमांकाच्या स्पर्धकांनी शगुन पोर्टलवर प्रसिद्ध करण्यासाठी आपल्या नवोपक्रमाची एक यशोगाथा/ केस स्टडी स्वरुपात मराठी व इंग्रजी भाषेतून (प्रत्येकी दोन पाने) तयार करून आणावी.


टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

">Responsive Advertisement
close