“माझे संविधान,माझा अभिमान” उपक्रम राबविण्याचा शासन निर्णय | Government decision to implement "My Constitution, My Pride" initiative

 “माझे संविधान,माझा अभिमान” संविधान दिनानिमित्त उपक्रम राबविण्याचा शासन निर्णय 

       संविधान हे कोणत्याही देशाच्या बांधणीचा पाया असतो. असंख्य भाषा, जाती ,पंथ,धर्म असणाऱ्या वैविध्यपूर्ण भारतासारख्या देशाला एकता,न्याय ,समता आणि बंघुता या मूल्यांच्या आधारावर सर्वांना जोडणारे असे भारतीय संविधान आहे. भारताचे एक सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वांतत्र्य,दर्जाची व संधीची समानता प्राप्त करून देणारे भारतीय संविधान दि.२६ नोव्हेंबर,१९४९ रोजी देशाला अर्पण करण्यात आले.

         भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्राला प्रदान केलेल्या भारतीय संविधानातील मौलिक तत्त्वे, मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये स्वतंत्र भारताच्या नागरिकांना संस्कारेत करणारी आहेत. संविधानातील मूलतत्त्वे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे आणि त्यांना जागरूक नागरिक बनविणे याकरिता संविधानाची माहिती,संविधानातील मूलतत्वांचा प्रसार व प्रचार होणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांना झालेय जीवनापासूनच संविधानाचा परिपूर्ण परिचय होणे आणि जबाबदार नागरिक होण्यासाठी संविधानातील मूलतत्वांविषयी जाणीवजागृती होणे अशा विविध उद्देशांनी राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याची बाब झासनाच्या विचाराधीन होती.

दहावी March 2022 चे फॉर्म कसे  भरावे?

शासन परिपत्रक

          भारतीय राज्यघटनेतील मुलतत्वांची व्याप्ती आणि सर्व समावेशकता सर्व विद्यार्थ्यांना समजावी तसेच घटनेतील मूलतत्त्वे विद्यार्थ्याच्या मनावर कोरली जावीत यासाठी संविधानाचा परिपूर्ण परिचय विद्यार्थ्यांना होणे आवश्‍यक आहे.भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने भारतीय संविधानाविषयी जाणीवजागृती आणि भारतीय संविधानातील मूलतत्त्वांचा विद्यार्थ्यांनी जबाबदार, सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक होण्यासाठी आपल्या जीवनात अंगिकार करून त्याद्वारे संविधानाचा योग्य सन्मान करण्याकरिता शासनाने दिनांक २३ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत माझे संविधान,माझा अभिमानउपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

           राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध लेखन,काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा,घोषवाक्ये,पोस्टर निर्मिती इ. अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन स्वरुपात आयोजन करण्यात यावे.

सविस्तर शासन परिपत्रक

Post a Comment

If you have any doubts, please let be know.

أحدث أقدم
close