राज्यातील शिक्षकांसाठी गुगल क्लासरूमचे ऑनलाईन प्रशिक्षण | Google Classroom Training
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मुलांचे शिक्षण थांबवू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. शिक्षक व विद्यार्थी यांच्या आंतरक्रियांचे शिक्षणात अनन्यसाधारण महत्त्व आहे.
![]() |
Teacher Training |
सद्यस्थितीत शाळा, कनिष्ठ महाविद्यालय सुरु झाले असले तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी व शिक्षक यांना प्रत्यक्ष संवाद साधता यावा. शिक्षकांना, विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देता यावे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता यावे व विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्यांच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्यामार्फत राज्यातील सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासाठी गूगल क्लासरूम ही सुविधा मोफत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहे
याअंतर्गत प्रत्येक शिक्षकास विद्यार्थ्यास शाळेसाठी G-Suit आयडी तयार करून देण्यात येणार आहे. याच्या साह्याने शिक्षक एकावेळी कमाल 250 विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन तासिका घेऊ शकतात. सदर तासीका रेकॉर्ड करून विद्यार्थ्यांना कधीही पाहण्यासाठी उपलब्ध होऊ शकणार आहेत.
याअंतर्गत शिक्षकांसाठी अनलिमिटेड स्टोरेजचे G-Suit आयडी व विद्यार्थ्यांसाठी काही कमाल मर्यादा असणारे G-Suit आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहेत. ज्याचा वापर करून गूगल क्लासरूम च्या माध्यमातून शिक्षण प्रक्रिया अधिक संरक्षित माध्यमातून सुरू राहू शकते.
गुगल केवळ गूगल क्लासरूम हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे आणि शिक्षक व विद्यार्थी यांचा डेटा केवळ शालेय शिक्षण विभागाकडे राहणार आहे.
सदर सुविधा राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासाठी उपलब्ध होत्त आहे. मागील टप्प्यात राज्यस्तरावरून राज्यातील शासकीय, स्थानिक, स्वराज्य संस्थांच्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यामधील तंत्रस्नेही शिक्षकांसाठी गुगल क्लासरुमचे प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते.
![]() |
Teacher Training |
त्यानंतर पुढील टप्प्यात खाजगी अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, खाजगी विनाअनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यामधील शिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे.
गूगल क्लासरूम च्या प्रशिक्षणासाठी प्राधान्याने पहिल्या टप्प्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमधील ज्या तंत्रस्नेही शिक्षकाकडे इंटरनेट सुविधेसह डेस्कटॉप संगणक / इंटरनेट सुविधेसह लॅपटॉप अथवा फक्त प्रशिक्षण कालावधीमध्ये ज्यांना इंटरनेट सुविधेसह दोन स्मार्टफोन उपलब्ध होऊ शकतील अशा शिक्षकांनी https://google.addingdimensions.in या लिंक वर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करावी.
सदर प्रशिक्षण हे सुमारे तीन तासांचे असणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यस्तरावरून 40 हजार शिक्षकांची ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात घेण्यात आले आहेत. यानंतर तालुकानिहाय तालुका स्तरावरुन उर्वरित शिक्षकांसाठी देखील गुगल क्लासरुमचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात येणार आहे.
सदर लिंक वर नाव नोंदणी केल्यावर संबंधित शिक्षकास प्रशिक्षणाच्या मार्गदर्शक सूचना कळतील. तसेच एसएमएस द्वारे सदर शिक्षकास गूगल क्लासरूम चा आयडी पासवर्ड व प्रशिक्षणाचा तपशील करणार आहे.
प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करण्यासाठीखालील लिंकला क्लिक करा.
If you have any doubts, please let be know.