Google Classroom Training fo Teachers | शिक्षकांना गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील मुलांचे शिक्षण थांबू नये यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून सातत्याने विविध माध्यमांचा वापर केला गेला. यानुसार संदर्भ क्रमांक.२ अन्वये प्रथम टप्प्यामध्ये राज्यातील एकूण ४०,००० शिक्षकांना ऑनलाईन स्वरूपामध्ये गुगल क्लासरूमचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. सद्यस्थितीमध्ये ग्रामीण व शहरी भागातील शाळा सुरु करण्यात आलेल्या आहेत. तरी दैनंदिन अध्यापनामध्ये विविध डिजिटल टूल्सचा प्रभावी व यशस्वी वापर शिक्षकांना करता येणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देणे, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे व विद्यार्थ्याना शिक्षकांच्या अध्यापनाचा, गृहपाठाचा, सूचनांचा त्याच्या सोयीच्या वेळी पाहिजे तेव्हा लाभ घेता यावा यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र व गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शिक्षकांना अध्यापनासाठी उपयुक्त असे ““Digital Leadership for Teaching and Learning in the Classroom” या विषयावरील दोन दिवसीय ऑनलाइन वेबिनार चे आयोजन दिनांक 23 व 24 डिसेंबर 2021 रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. सदरच्या वेबिनार मध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा गूगल टूल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे.
दिवस – दुसरा
दिनांक- २४ डिसेंबर २०२१
दुपारी ३:०० ते ५:००
Click Here - Google Classroom Training For Teacher (1st and 2nd Day)
Tag-google classroom training for teachers,google classroom training for teachers free,google classroom training for teachers videos,google classroom training for teachers ppt,google classroom training for teachers pdf,google classroom teacher training 2020-21
If you have any doubts, please let be know.