दहावी व बारावी बोर्डाचे फॉर्म भरू शकता परीक्षेच्या आदल्या दिवसा पर्यंत
सन
२०२२ च्या इ 1० वी व इ.
१२ वी
च्या परीक्षेसाठी आवेदनपत्र भरणार्या विद्यार्थ्याना विलब शुल्क आकारण्यात येऊ नये/विलंब शुल्क माफ करण्यात यावे. तसेच
विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत ऑनलाईन
आवेदनपत्र भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी असे शासनाने पत्र
क.लवेसू-२०२१/प्र.क. ९७/एसडी-२ दि.२८/१२/ २०२१ च्या पत्रान्वये कळविलेले
आहे.
त्याअनुषंगाने
सदर सुविधा मार्च-एप्रिल २०२२ या वर्षापुरतीच मर्यादित राहील. माध्यमिक शालान्त
प्रमाणपत्र (इ.१० वी)
परीक्षा माहे दि.2५/०३/
२०२२ व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र ( इ. १२ वी
) परीक्षा माहे दि.०४/०३/ २०२२
पासून सुरु. होत असल्याने
परीक्षेच्या एक दिवस अगोदर (आदल्या दिवसा) पर्यंत ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरण्याची सुविधा नियमित शुल्काने उपलब्ध करुन देण्यात आलेली
आहे.
तरी
याबाबतची सर्व मुख्याध्यापक /प्राचार्य,
सर्व माध्यमिक शाळा,उच्च
माध्यमिक शाळा/ कनिष्ठ महाविद्यालये,
शिक्षक , विद्यार्थी, पालक
व इतर संबंधित घटकांनी नोंद घ्यावी.
If you have any doubts, please let be know.