"जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२

0 Mr. Annasaheb Babar

"जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियान दि. ०३ ते १२ जानेवारी२०२२

जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२

       भारताच्या इतिहासावर ज्यांची अमीट छाप आहे अशी दोन महत्त्वाची स्रीरत्ने म्हणजे राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यात आणि त्यातून स्वराज्य निर्मिती करून समस्त जनतेत स्वाभिमान, आत्मसन्मान, शौर्य यांचे प्राण फुंकण्यात ज्यांचा बहुमोल वाटा आहे त्या म्हणजे राजमाता जिजाऊ होत. जिजाऊंचे एकूणच व्यक्तिमत्त्व एक 'माता' म्हणून जितके प्रभावशाली होते तितकेच ते एक समर्थ, स्वावलंबी, स्वाभिमानी, आत्मविश्वासाने परिपूर्ण,अचूक राजकीय निर्णयक्षमता, सामाजिक भान, महिलाविषयक तळमळ आणि उत्तम प्रशासकीय जाण असलेली अष्टपैलू 'स्री' म्हणून देखील प्रभावशाली होते. जिजाऊंच्या या समग्र गुणांचे अनुकरण जर आजच्या मुलींनी केले तर नक्कीच स्रीसबलीकरणाचा एक आदर्श समाजात निर्माण होईल.

जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा अभियान दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२

भारतीय स्त्रीने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि कर्मठ समाजव्यवस्थेत स्त्रीशिक्षणाचा प्रारंभ करण्याचे आणि त्यासाठी समाजकंटकांच्या जाचाला धीराने सामोरे जाण्याचे धाडस त्यांनी दाखविले म्हणूनच आजची स्री ज्ञान तेजाने तळपत आहे.

जिजाऊ आणि सावित्री या महान स्रियांच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्त्वाचा आदर्श घेऊन आजच्या मुलींनी आपल्या जीवनाची वाटचाल केल्यास सक्षम, स्वावलंबी आणि धाडसी समाज निर्माण होण्यास नक्कीच मदत होईल. त्यामुळे अगदी झालेय स्तरापासून विद्यार्थिनींना राजमाता जिजाऊ आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची आणि कार्याची समग्र ओळख होणे आव्यक आहे. हा केवळ विचार नाही तर जिजाऊ ते सावित्री हा 'स्री- सन्मान मार्ग आहे. स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱया राजमाता माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा" अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

झासन परिपत्रक :

      असंख्य अडचणींवर मात करून स्री-शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ०३ जानेवारी रोजी साजरी करण्यात येते. तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षणदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योध्दा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजाण पालकत्वाचे आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत. यास्वी जीवनासाठी आवऱ्यक मूल्ये शालेय विद्यार्थ्याच्या मनावर बिंबविणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

     राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात यावा. सदर अभियानाच्या कालावधीमध्ये शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात यावेत.

या अनुषंगाने शालेय स्तरावर दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत खालील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी संबंधितगुगल टेस्ट सोडवा आणि प्रशस्तिपत्रक मिळवा. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close