दहावी व बारावी परीक्षांच्या तारखांची झाली घोषणा
माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी आणि उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच बारावी परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक दरवर्षी नोव्हेंबरमध्येच जाहीर होते. परंतु करोनाच्या प्रादुर्भावामुळे हे वेळापत्रक येण्यास उशीर झाला.
शिक्षणमंत्री
वर्षा गायकवाड यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च 2022 ते
७ एप्रिल 2022 या कालावधीत होईल. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा १४
फेब्रुवारी 2022 ते ३ मार्च 2022 पर्यंच होणार आहेत. तसेच दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते
१८ एप्रिल या कालावधीत होणार आहे. दहावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी आणि लेखी परीक्षा २५
फेब्रुवारी 2022 ते १४ मार्च 2022 या कालावधीमध्ये होणार आहेत.
करोनाच्या
पार्श्वभूमीवर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील शाळा/कनिष्ठ महाविद्यालये
ऑक्टोबर २०२१ पासून विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीसह सुरू झाली आहेत.
त्याअनुषंगाने इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावी साठी शालेय शिक्षण विभागामार्फत
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन तसेच लेखी
परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर परीक्षा
कालावधीमध्ये मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शालेय शिक्षण
मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
नमस्कार विद्यार्थी व पालक हो,
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 16, 2021
सर्व संबंधित घटकांशी, शिक्षणतज्ज्ञांशी विचारविनिमय केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (HSC) व माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC) बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक आम्ही जाहीर करत आहोत.#SSCexams #HSCexams @msbshse @CMOMaharashtra @MahaDGIPR pic.twitter.com/ZWwQoKAbV8
If you have any doubts, please let be know.