राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे" आयोजन
भारतीय गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा २२ डिसेंबर
जन्मदिन प्रत्येक वर्षी राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो. शालेय स्तरापासून
विद्यार्थ्यांना गणित विषयाची गोडी लागावी तसेच गणितीय दृष्टीकोन विकसित व्हावा यासाठी
गणित दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन २०२० नुसार, प्राथमिक स्तरावर प्रत्येक
विद्यार्थ्याने मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य
देण्यात आले आहे. त्यानुसार राष्ट्रीय व राज्य पातळीवर “निपुण
भारत अभियान” सुरु
करण्यात आले आहे. या अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांचे पायाभूत साक्षरता व प्रारंभिक
संख्याज्ञान (FLN) विकसित
व्हावे याकरिता उपक्रम राबविण्यात येत आहेत.
“निपुण भारत अभियान” अंतर्गत राष्ट्रीय गणित दिनानिमित्त “गणितोत्सवाचे" आयोजन दिनांक २० डिसेंबर ते २२ डिसेंबर, २०२१ या कालावधीत राज्यातील पूर्व प्राथमिक ते माध्यमिक स्तरावरील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये करण्यात यावे. या वर्षीच्या “गणितोत्सव” ची प्रमुख संकल्पना (Theme) “पायाभूत संख्याज्ञान” (FLN-foundational Numeeracy) ही निश्चित करण्यात येत आहे.
* पायाभूत संख्याज्ञान आणि गणितीय क्षमता
पायाभूत संख्याज्ञान म्हणजे साध्या संख्यात्मक संकल्पना आणि त्यांच्यातील कार्यकारणभाव
समजून घेऊन त्यांचा दैनंदिन जीवनातील समस्या सोडवण्यासाठी वापर करणे. गणनपूर्व संकल्पना,संख्यांची संकल्पना तसेच तुलना करणे, क्रमवार लावणे,वर्गीकरण करणे, आकृतिबंध ओळखणे यांचे ज्ञान
शाळापूर्व काळात होणे महत्वाचे आहे. पूर्व प्राथमिक वर्गात मूलभूत गणित शास्त्राचा
पाया पक्का होण्यासाठी
वरील बाबी महत्त्वाच्या आहेत.
“ गणितोत्सव “अंतर्गत खालील दौक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात
यावे.
सदर नियोजन करत असताना विद्यार्थी,शाळा,शिक्षक, पालक व झाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांचा सक्रीय व
उत्स्फूर्त सहभाग घेण्यात यावा.दिवस निहाय खालीप्रमाणे उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
If you have any doubts, please let be know.