वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण दिनांक १ जून २०२२ पासून
राज्यातील
शिक्षक/मुख्याध्यापक/अध्यापकाचार्य/प्राचार्य यांच्यासाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व
निवड श्रेणी प्रशिक्षण राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
यांचेमार्फत ऑनलाईन
स्वरूपामध्ये दिनांक १ जून २०२२ पासून सुरू होत आहे.
1. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन स्वरूपामध्ये राज्यातील एकूण 94,541 नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थीसाठी एकाच वेळी आयोजित करण्यात आले असून, यामध्ये राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील नोंदणीकृत प्रशिक्षणार्थी सहभागी होऊन ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत विकसित प्रशिक्षण (ई- कोर्स) पूर्ण करून त्यावरील स्वाध्याय, चाचणी सोडवून वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड श्रेणी प्रशिक्षण पूर्ण करू शकणार आहेत.
2. सदर ऑनलाईन प्रशिक्षण हे एकूण ५० ते ६० तासांचे असणार असून सदर प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी एकूण ३० दिवसांचा कालावधी देण्यात येईल. त्यामुळे प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षक आपले प्रशिक्षण ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ३० दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार, पूर्ण करू शकणार आहेत. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पात्र प्रशिक्षणार्थ्यास त्याच ऑनलाईन प्रशिक्षण प्रणालीच्या माध्यमातून प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध होणार आहे.
3. सदर प्रशिक्षणबाबतची सर्व माहिती दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता https://youtu.be/bOXSWx5NHlw या यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे देण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थीनीं सदर उद्बोधन सत्रास उपस्थित रहावे. तसेच सर्व पात्र प्रशिक्षणार्थ्यांसाठी दिनांक १ जून २०२२ पासून ३० जून २०२२ पर्यंत तांत्रिक अडचणी संदर्भात मार्गदर्शन सत्रांचे आयोजन देखील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदे मार्फत केले जाणार आहे. याबाबतची सर्व माहिती दि.१ जून २०२२ रोजी आयोजित यु ट्यूब लाईव्ह सत्राद्वारे दिली जाईल.
LIVE
१ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता
****************************
वनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईन व्हा.
1) WhatsApp Group (New Update)
Online Shikshak ASB 12
https://chat.whatsapp.com/C2P1uSdQpw6Iq8JDC9lIMj
2) Telegram Channel
https://t.me/onlineshikshakasb
3) Facebook Page
https://www.facebook.com/onlineshikshakasb
********************
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२१-२२,वरिष्ठ वेतन श्रेणी,निवड श्रेणी,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण शिबिर,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण,वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणार्थी यादी व सूचना,निवड वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी,वरिष्ठ व निवड श्रेणी,वरिष्ठ वेतन श्रेणी निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी,वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण,निवड श्रेणी प्रशिक्षण,वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणी कशी करावी
If you have any doubts, please let be know.