शालेय व इतर क्रीडा स्पर्धा यावर्षी होणार
कोविड-१९
प्रादूर्भावामुळे सन २०२०-२१ व २०२१-२२ या कालावधीत शालेय क्रीडा स्पर्धांचे तालुकास्तर ते
राष्ट्रीयस्तर आयोजन होऊ शकले नाही. सन २०२२-२३ या वर्षात शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यास शासन
मान्यता प्रदान करण्याबाबत संचालनालयाद्वारा प्रस्तावित करण्यात आले होते.तसेच सन
२०२२-२३ या वर्षात भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारा राष्ट्रीय शालेय क्रीडा
स्पर्धांच्या आयोजनाबाबत अनिश्चितता दिसून येत असल्याने, राज्यातील विविध खेळप्रकारांतील
खेळाडूंना विविध प्रकारांमध्ये राज्यस्तरापर्यंतच्या क्रीडा स्पर्धामधील
सहभागाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यस्तरापर्यंतच्या शालेय क्रीडा स्पर्धांच्या
आयोजनांस झासनाने संदर्भिय पत्र क्रमांक ८ अनुसार मान्यता प्रदान केली आहे.
सन
२०२२-२३ मध्ये संदर्भिय शासनपत्र क्रमांक २ ते ७ अन्वये शालेय क्रीडा स्पर्धेत
समावेहा केलेल्या खालील खेळप्रकारांच्या शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन
तालुकास्तर, जिल्हास्तर, विभागस्तर व क्रमाने करणे प्रस्तावित करण्यात येत आहे.