केंद्रप्रमुखांची रिक्‍त पदी भरती २०२२

केंद्रप्रमुखांची रिक्‍त पदी भरती २०२२

केंद्रप्रमुखांची रिक्‍त पदे भरणेबाबत दिनांक ०२/०२/२०१० रोजीच्या शासन निर्णयानुसा सदर पदे सरळसेवा,विभागीय स्पर्धा परौक्षेद्वारा व पदोन्नतीद्वारे ४० : ३० : ३० या प्रमाणात भरती करावयाचे आदेश आहेत. तथापि तूर्त शासन निर्णय दिनांक ०२/०२/२०१० नुसार शासन निर्णयात नमूद केल्यानुसार पदोन्नतीची ३० टक्के पदे भरण्याची तात्काळ कार्यवाही करणेबाबत व केंद्रप्रमुखांच्या निवड प्रक्रियेअंतर्गत भाषा, गणित, विज्ञान व सामाजिक शास्त्र, इतिहास व भुगोल विषयांसाठी समप्रमाणात पदे भरण्याबाबत तसेच सदर विषयानुरुप केंद्रप्रमुखांची जी पदे भरणे शक्‍य आहे ती पदे तात्काळ भरणेबाबत  पत्रान्वये संचालनालयास आदेशित केलेले आहे.

 दिनांक २६/०७/२०२२ चे बैठकीचे इतिवृत्तामधील मुद्दा क्र. २ मधील उप मुद्दा क्र. २.२ व २.४ नुसार व दिनांक ०२/०२/२०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार केंद्रप्रमुखांची ३० टक्के च्या मर्यादित पदोन्नतीने व विषयाच्या समप्रमाणात जी पदे भरणे शक्‍य आहे ती रिक्‍त पदे भरणेबाबतची कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल योग्य त्या अभिप्रायासह संचालनालयास सादर करावा. सोबत दिनांक २६/०७/२०२२ चे बैठकीचे इतिवृत्ताची छायांकित प्रत माहितीसाठी तथा सुलभ संदर्भासाठी सदर पत्रासोबत संलग्न केली आहे.



टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

">Responsive Advertisement
close