वह्यांची पाने पाठ्यपुस्तकात दिल्याने विद्यार्थ्यांना फायदा होईल का ?

 वह्यांची पाने पाठ्यपुस्तकात दिल्याने विद्यार्थ्यांना फायदा होईल का ?

वह्यांची पाने पाठ्यपुस्तकात दिल्याने विद्यार्थ्यांना फायदा होईल का ?

पाठ्यपुस्तकांमध्ये प्रामुख्याने क्रमिक पाठ्यक्रमावर आधारित पाठ्यांश दिला जातो. महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था ही गोरगरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत एकसमान शिक्षण देण्यासाठी निर्माण केलेली आहे. पाठ्यपुस्तके ही त्याचाच एक भाग आहे. गरिबांच्या किंवा गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना वह्या विकत घेणे देखील अनेकदा परवडत नाही. त्यामुळे त्यांचे शाळेमधील शिक्षण/ वर्ग कार्य योग्य प्रकारे घडत नाही. हे लक्षात घेऊन पाठ्यपुस्तकांमध्येच वह्यांची पाने देण्याबाबतचे नियोजन शासन स्तरावर सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून, शाळेत प्रत्यक्ष शिकवणाऱ्या शिक्षकांकडून या संदर्भाने वास्तववादी माहिती मिळवण्यासाठी ही छोटीशी प्रश्नावली तयार केलेली आहे.

https://academics.balbharati.in/notebook/

          पाठ्यपुस्तकातील वह्यांची पाने समाविष्ट करण्याची निकड जाणून घेण्यासाठी आपल्या कामातून पाच मिनिटे वेळ यासाठी काढून ही प्रश्नावली जरूर भरून पाठवावी. तसेच विद्यार्थ्यांसाठी तळमळीने काम करणाऱ्या इतर शिक्षकांनादेखील ही प्रश्नावली भरण्यास प्रवृत्त करावे, ही विनंती. एखाद्या वेळेस हा निर्णय महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवस्थेसाठी दूरगामी परिणाम करणारा ठरेल. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

POST ADS1

POST ADS 2

">Responsive Advertisement
close