दहावी व बारावी च्या बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरण्यास मुदत वाढ | Extension of deadline for filling the forms of 10th and 12th board examination
महाराष्ट्र
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये
घेण्यात येणार्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा देऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांना
नियमित शुल्कासह अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.
बारावीचे
विद्यार्थी:
बारावीच्या
विद्यार्थ्यांना 15 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
दहावीचे
विद्यार्थी:
दहावीच्या विद्यार्थ्यांना 25 नोव्हेंबरपर्यंत
नियमित शुल्क देऊन अर्ज भरता येणार आहे.
अशी
माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली आहे.
फेब्रुवारी-
मार्च 2023 च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणार्या नियमित, व्यवसाय अभ्यासक्रम
घेणारे, सर्व शाखांचे पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले
खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, औद्योगिक प्रशिक्षण
संस्थेद्वारे (आयटीआय) ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणार्या विद्यार्थ्यांचे अर्ज
दिलेल्या मुदतीत शाळा, महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन पद्धतीने भरता येणार. “
संकेतस्थळ:
दहावीची
परीक्षा देणार्या पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी
विद्यार्थी, तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन, आयटीआयद्वारे
ट्रान्स्फर ऑफ क्रेडिट घेणार्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन पद्धतीने अर्ज
भरण्यासाठी मुदत : 25 नोव्हेंबर
माध्यमिक शाळांना चलनाव्दारे बँकेत शुल्क
भरण्यासाठी मुदत : 29 नोव्हेंबर
प्री-लिस्ट चलनासोबत विभागीय मंडळात जमा करण्यासाठी मुदत : 1 डिसेंबर
बारावीसाठी
15 नोव्हेंबरपर्यंत (नियमित शुल्कासह) आणि 16 ते 30 नोव्हेंबर (विलंब शुल्कासह)
अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. तसेच उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ
महाविद्यालयांनी चलनाद्वारे बँकेत शुल्क भरण्यासाठी 2 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात
आल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
बारावी प्रकटन
दहावी प्रकटन
Tag-दहावी आणि बारावी 17 नंबर फॉर्म,दहावी बारावी चे पेपर ऑनलाईन होतील की ऑफलाईन.,12 वीची परीक्षा 2022 साठी परीक्षा फॉर्म भरण्याचा कालावधी,खाजगी विद्यार्थी 17 नंबर फॉर्म मुदतवाढ,बारावी परीक्षा,17 नंबर फॉर्म मुदतवाढ,hsc exam form 2022 मुदतीत वाढ,पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती ची कोणत्या cast साठी मुदत वाढ झाली.,बारावी चे पेपर होतील ऑनलाईन,17 नंबरचा फॉर्म ऑनलाईन कसा भरावा,खाजगी विद्यार्थी 17 नंबर फॉर्म अंतिम दिनांक,दहावी चे पेपर होतील ऑनलाईन,17 नंबर फॉर्म ची लास्ट तारीख