शाळेत विद्यार्थ्याला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश राज्यातील कोणत्याही शासकीय/ महानगरपालिका/ नगरपालिका/ खाजगी अनुदानित/कोणत्याही व्यवस्थापनाकड...
शाळेत विद्यार्थ्याला वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश
राज्यातील कोणत्याही शासकीय/ महानगरपालिका/ नगरपालिका/ खाजगी
अनुदानित/कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्थित तत्त्वावर चालविण्यात
येणारी व कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळास संलग्न असलेल्या
प्राथमिक शाळेत इयत्ता १ली ते ८ वी च्या वर्गात अन्य शाळेतून विद्यार्थी
प्रवेशासाठी मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्यांना T.C. (Transfer Certificate) अभावी प्रवेश नाकारण्यात येवू नये. आरटीई अधिनियमातील कलम-४ अन्वये शालेय प्रवेशित
न झालेल्या विद्यार्थ्यास वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात येईल असे नमूद आहे
आणि कलम १४ (१) नुसार प्रवेशासाठी वयाचा पुरावा ग्राह्य समजण्यात यावा अज्ञी तरतुद
आहे. त्यानुसार दाखला पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येवून विद्यार्थ्यांना
वयानुरूप वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा.
राज्यातील कोणत्याही शासकीय/ महानगरपालिका/ नगरपालिका/ खाजगी
अनुदानित/ कोणत्याही व्यवस्थापनाकडून स्वयंअर्थसहाय्थित तत्त्वावर चालविण्यात येणारी
व कोणत्याही भारतीय वा परदेशी अभ्यासक्रम अथवा मंडळास संलग्न असलेल्या माध्यमिक
शाळेत इयत्ता ९ वी ते १० वी च्या वर्गात अन्य शाळेतून विद्यार्थी प्रवेशासाठी
मागणी करीत असेल अशा विद्यार्थ्यांना T.C. (Transfer Certificate) अभावी प्रवेश नाकारण्यात येवू नये. याबाबत माध्यमिक शाळा संहितेतील
तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश देवून पुढील आवश्यक कार्यवाही
करण्यात यावी. पूर्वीच्या शाळेकडून T.C. (Transfer Certificate) प्राप्त न झाल्यास प्रवेशित होणाऱ्या शाळेत विद्यार्थ्याला वयानुरूप
वर्गामध्ये प्रवेश देण्यात यावा. यासाठी जन्मतारखेचा दाखला पुरावा म्हणून ग्राह्य
धरण्यात येवून इयत्ता १० वी पर्यन्त वयानुरूप वर्गात प्रवेश देण्यात यावा.
प्रवेशापासून विद्यार्थी वंचित राहणार नाही, तसेच शिक्षण खंडीत
होऊन विद्यार्थी शाळाबाह्य होऊ नये याची दक्षता संबंधित शाळा प्रमुखांनी /
मुख्याध्यापकांनी घ्यावी. असे विद्यार्थी वंचित ठेवल्यास संबंधित झाळेविरूद्ध /
मुख्याध्यापका विरूद्ध नियमानुसार / कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.
उपरोक्त
प्रमाणे एखाद्या विद्यार्थ्याने नवीन शाळेत प्रवेश घेतल्यास अशी नवीन शाळा सदर विद्यार्थ्याची
सरल पोर्टल वरील माहिती मिळविण्याची विनंती जुन्या शाळेकडे करेल, व
जुनी शाळा ७ दिवसाच्या आत विनंती मान्य करेल. शाळेने अशी विनंती मान्य न केल्यास
संबंधित केंद्र प्रमुख अशी विनंती त्यांच्या स्तरावरून मान्य करतील.
COMMENTS