१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेपूर्वी ची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून मिळणार

0 Mr. Annasaheb Babar

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्याना परीक्षेपूर्वी ची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून मिळणार 

माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्‍नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्‍नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर करण्यात येत होते. इ.१० वी व इ. १२ वी च्या परीक्षा विद्यार्थ्याच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समा घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते. परंतु प्रश्‍नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप, भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्‍नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून रद्‌द करण्यात येत असल्याचे कळविण्यात आलेले आहे.

तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर वाढवून देण्यात येत आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२३ परीक्षेपासून सकाळ सत्रात स. ११.०० वाजता तसेच दुपार सत्रात दु. ३.०० वाजता परीक्षा दालनात प्रश्‍नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल सकाळ सत्रात स. १०.३० वाजता तसेच दुपार सत्रात दु. २.३० वाजता परीक्षार्थ्यांने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.




Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close