शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023

0 Mr. Annasaheb Babar

शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023

Quality Educational Video Production Contest 2023 for Teachers
शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धा 2023


उत्कृष्ट व्हिडीओ निवडीचे निकष -

  • व्हिडीओ निर्मिती साठी आवश्‍यक आशय - मजकूर आदर्श असावा.
  • लिंग समभाव,शासकीय ध्येय धोरणाशी सुसंगत आहय असावा.
  • व्हिडीओ हा विद्यार्थी वयोगट विचारात घेऊन निर्मित केलेला असावा.
  • व्हिडीओ ची साईज ही विद्यार्थी किंवा इयत्तेनुसार असावी.
  • निर्मित व्हिडीओ मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असेल तर उत्तम.
  • व्हिडिओमधील मजकूर, चित्रे, रंगसंगती अचूक व योग्य असावीत.
  • शिक्षकांनी स्वतः केलेले व्हिडीओ चित्रीकरण, सादरीकरण, एडिटिंग इत्यादी बाबींना महत्व असेल.

* आवाजात सुस्पष्टता असावी. आवाजाची / बोलण्याची गती योग्य प्रमाणात असावी. आवाज आरोह-अवरोह युक्त असावा. बँकग्राउंड नॉईज नसावा. जर बँकग्राउंड म्युझिक घेणार असाल तर ते कमी आवाजात असावे. बँकग्राउंड म्युझिक व आवाज हे स्लाईडच्या आायाशी संबंधित असावे.

व्हिडीओ निर्मितीसाठी महत्वाच्या बाबी -

  • शैक्षणिक अभ्यासक्रमावर आधारितच व्हिडीओ बनविणे आवड्यक आहे.
  • वरील व्हिडीओ अध्ययन-अध्यापन प्रणालीशी निगडीत असणे आवश्‍यक व्हिडिओ बनविणाऱ्याने स्वत: चा थोडक्यात परिचय समावेश करावा.
  • व्हिडीओ कन्टेन्ट निर्मिती करणाऱ्या शिक्षकाचे नाव, शाळा, पत्ता या बाबी व्हिडिओमध्ये समाविष्ट करू नयेत. व्हिडिओच्या शेवटी या बाबी फक्त स्क्रिनवर दिसाव्यात.
  • घटक, व्हिडिओमधून कोणती अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे, हे सुरुवातीला स्क्रिनवर दाखवावे.
  • व्हिडीओ ची लांबी कमीत कमी ५ मि. व जास्तीत जास्त ९ मिनिटांची असावी.
  • व्हिडीओ फॉरमॅट MP४ असावा.
  • व्हिडीओ मध्ये कुठेही स्वतःच्या समाज माध्यमांची, व्यावसायिक जाहिरात समाविष्ट नसावी, उल्लेख नसावा.
  • व्हिडीओ मधील मजकूर व आडायाबाबत पूर्णतः संबंधित शिक्षक जबाबदार असणार आहे, याची नोंद घ्यावी.
  • व्हिडीओ मध्ये वापर करण्यात येणारी इमेज अथवा मजकूर हा कॉपीराईट मुक्‍त (Creative Common) असण्याबाबत दक्षता घेण्यात यावी. कॉपीराईटची लायसन्सच्या सर्व मार्गदर्शक सूचनांची काळजी घ्यावी. याबाबत काही आक्षेप आल्यास संबंधित स्पर्धक जबाबदार असतील.
  • राज्यस्तरावरून निवड करण्यात आलेल्या व्हिडीओजच्या Creater ला तो व्हिडीओ त्यांनीच तयार केला आहे हे सिद्ध करावे लागेल. अन्यथा तो व्हिडीओ स्पर्धेतून बाद करण्यात येईल.
  • शैक्षणिक व्हिडिओच्या दर्जानुसार शिक्षकांना प्रोत्साहनपर बक्षीस दिले जाईल व सदरच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओज हे त्याच्या Creater च्या नावासह शिक्षण विभागाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल.
  • स्टॉक शॉट्स किंवा कोणतेही कॉपीराइट केलेले ग्राफिक्स/इमेज संकलित करून तयार केलेले व्हिडिओ स्पर्धेसाठी पात्र नसतील.
  • एका स्पर्धकाने एका गटासाठी फक्त एकच व्हिडिओ पाठवावा.
  • सर्व नोंदींची एक प्रत संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेकडे राखून ठेवली जाईल.
  • पुरस्कार विजेत्या व्हिडिओचे प्रसारण DIKSHA/OER आणि SCERTमा द्वारे व्यवस्थापित इतर वेबसाइट्स/पोर्टलवर अपलोड करण्यात येतील.
  • तालुका/ जिल्हा राज्य स्तरावरील स्पर्धांचे निकाल तालुका/ जिल्हा/ राज्य निवड समिती मार्फत अंतिम केला जाईल (स्वतंत्रपणे ऑडिओ आणि अँनिमेशन/इमर्सिव्ह ई-कॉन्टेंट/डिजिटल गेम्स आणि अँप्लिकेशन श्रेणीसाठी) ज्युरीने घोषित केलेले निकाल बंधनकारक असतील.












टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close