दहावीच्या गुणपत्रिका व इतर साहित्य वाटपाबाबत महत्त्वाची सूचना
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल १३ मे २०२५ रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात आला आहे.
निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका व इतर साहित्य संबंधित विभागीय मंडळामार्फत शाळांना वितरित करण्यात येणार आहे.
गुणपत्रिका वाटपाची तारीख व वेळ:
- तारीख: २६ मे २०२५ (सोमवार)
- वेळ: दुपारी ३.०० वाजता
या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या संबंधित शाळेमार्फत गुणपत्रिका व इतर साहित्य प्राप्त करून घ्यावे. शाळांनी देखील विभागीय मंडळातून वेळेत साहित्य प्राप्त करून विद्यार्थ्यांना वाटप करण्याची कार्यवाही करावी.
– महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
महत्त्वाच्या सूचना:
- विद्यार्थ्यांनी शाळेच्या सूचनेनुसार वेळेवर उपस्थित राहावे.
- गुणपत्रिका मिळवताना ओळखपत्र बरोबर ठेवावे.
- गुणपत्रिका मिळाल्यावर सर्व माहिती तपासून घ्यावी.
- गुणपत्रिकाची प्रिंट काढून जतन करून ठेवा.
tag -#१०वीगुणपत्रक, #गुणांचेसण, #विद्यार्थ्यांचा_सन्मान, #YashachiSuruvat, #SSCResult2025, #ProudMoment, #SchoolEvent, #ShalaParinam, #SuccessCelebration
If you have any doubts, please let be know.