Pavitra Portal Latest Update 2020


इ ९ वी ते इ १२ वी या गटातील खाजगी संस्थातील रिक्त पदासाठी शिफारस पात्र उमेदवाराची यादी
******************************



१). मा.उच्च न्यायालय,खंडपिठ नागपूर येथील याचिका क्र ४०७९/२०१९ मध्ये दि २८/०८/२०१९ रोजी दिलेल्या निर्णयानुसार खाजगी संस्थेतील इ. ९ वी ते इ १२ वी या गटातील पदासाठी महाराष्ट्र खाजगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१ नुसार खाजगी माध्यमिक शाळेतील ( इ ९ वी ते इ १० वी) पदासाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेतील ( इ ११ वी ते इ १२ वी) पदासाठी किमान व्दितीय श्रेणी असणा-या उमेदवारांना विचारांत घेऊन नव्याने प्रक्रिया करण्यात आलेली आहे.

२). मा. उच्च न्यायालय , खंडपिठ औरंगाबाद येथील याचिका क्र. ७९३८/२०१९ With C.A. ९९८/२०२० , याचिका क्र. ८००१/२०१९ With C.A. ८३०/२०२० व याचिका क्र. १२६०३/२०१९ मध्ये दिनांक ३१/०१/२०२० रोजी दिलेल्या निर्णयानुसार OBC या संवर्गासाठीची एक जागा वगळून इयत्ता ९ वी ते १२ वी या गटातील पदासाठी शिफारस पात्र ८३८ उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे.

३). मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या १० खाजगी शैक्षणिक संस्थातील आरक्षण आणि रिक्त पदे यानुसार शिफारस पात्र उमेदवारांच्या संस्थानिहाय शिफारस पात्र उमेदवारांची यादी ((Graduate Teacher (9 to 12) Round-8)) आणि शासन परवानगी प्राप्त झाल्याने माजी सैनिक व अन्य शिल्लक समांतर आरक्षणातील (भूकंपग्रस्त) वगळता योग्य उमेदवार उपलब्ध झाले नाहीत अशी पदे त्या त्या प्रवर्गातील 'Pure' मध्ये रूपांतरित करून गुणवतेनुसार दुसरी शिफारस पात्र उमेदवारांची यादी ((Graduate Teacher (9 to 12) Converted Round-9)) प्रसिद्ध करण्यात येत आहे.

४). रयत शिक्षण संस्था सातारा, श्री स्वामी शिक्षण संस्था कोल्हापूर, महात्मा फुले शिक्षण संस्था इस्लामपूर ता. वाळवा जिल्हा सांगली या संस्थांच्या दोन याद्या ((Graduate Teacher (9 to 12) Round-8 And Graduate Teacher (9 to 12) Converted Round-9)) तर उर्वरित ७ संस्थाची शिफारस पात्र उमेदवारांची यादी ((Graduate Teacher (9 to 12) Round-8)) प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
५). शिफारस पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवारांच्या लॉगिनवर निवडीचा तपशील उपलब्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे उमेदवारांनी पवित्र पोर्टल वरील Applicant वर क्लिक केल्यानंतर होम पेज वर उपलब्ध असलेली शिफारस पात्र उमेदवारांची यादी पहावी.

६).यादीतील उमेदवारांनी पुढील कार्यवाहीसाठी आपल्याशी संबंधित संस्थेच्या नियुक्ती प्राधिकारी यांचेशी दि. १५/०२/२०२० पर्यंत संपर्क साधावा.

1)Consolidated    Round _8




2) Converted Round_9


If you have any doubts, please let be know.

थोडे नवीन जरा जुने

ads

ads

نموذج الاتصال

close