मराठी कोडी व उत्तरे | Latest Puzzles in Marathi -1

3 Mr. Annasaheb Babar

मराठी कोडी व उत्तरे | Latest Puzzles in Marathi -1


      या लेखामध्ये 20 मजेदार मराठी कोडी दिलेली आहेत. बघुया तुमच्या किती कोड्यांची उत्तरे बरोबर येतात.

1) एका माणसाकडे दोन बैल होती एक मेला एक विकला तर त्याच्याकडे किती  बैल शिल्लक राहिली ?

2) बाईक वर बसुन एक पुरुष आणि एक स्त्री रस्त्यावरुन जात असतात. चौकात त्यांना पोलीस अडवतो आणि विचारतो हि तुझी कोण?
पुरुष सांगतो :- हिचा सासरा माझ्या सासऱ्याचा बाप आहे.
तर या दोघांत नातं काय?

3) एका बाईला नदीच्या पलीकडे पीठ दळायला जायचे होते ती कशी जाईल?

4) अशी कोणती जागा आहे,
जेथे जर १०० लोक गेले,
तर ९९ लोकच परत येतात?
लावा आता डोकं…

5) वाजते पण ऐकायला येत नाही अशी ती काय?

6) एका माणसाचे चार अक्षरी नाव काय?
ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव.
दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव.
तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव.
व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव.
सांगा पाहु ते नाव काय?

7) एका टेबलावर तीन सफरचंद आहेत आणि तुम्ही त्यापैकी दोन काढून घेतले.
तुमच्याकडे आता किती सफरचंद शिल्लक आहेत?

8) एक मुलगा आणि एक अभियंता बाजार करण्यासाठी जातात.
तो मुलगा अभियंताचा मुलगा आहे, पण अभियंता त्या मुलाचे बाबा नाहीयेत.
हे कसे शक्य आहे?

9) एक माणूस आपल्या बायकोला मारतो आणि तिच्या शरीराला झाडा-झुडुपात लपवतो.
दुसऱ्या दिवशी पोलिस त्या व्यक्तीला फोन करून सांगतात की त्याच्या बायकोची हत्या झाली आहे आणि त्या व्यक्तीला लगेचच गुन्हा घडलेल्या घटनास्थळी येण्यास सांगतात.
तो माणूस घटनास्थळी पोहचताच पोलीस त्याला अटक करतात. का?

10) एक कोंबडा  नदीतील नावेच्या कडेवर बाहेरच्या दिशेला तोंड करून बसलाआहे तर त्याचे अंडे कोणत्या बाजूला पडेल?

11) एक राजकुमारी तिच्या काही मैत्रिणीं सोबत बागेत फिरायला गेली असताना समोरून एक राजकुमार येतो आणि राजकुमारीवर मोहीत होऊन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो,
कसा दिसतोय मी?
तेव्हा राजकुमारी उत्तर देते,
मेघनाद रिपुतात वधी ज्या नराला।।
ते नाव आहे द्वादशात पाचव्याला।।
सरता तयासी दिन अस्तमानी।।
ज्या नर पूजिती (तैसा) दिसतोसी नयनी।।
आपला प्रश्न असा आहे की वरील राजकुमार कसा दिसतोय हे राजकुमारीने नेमके काय सांगितले?

12) लाल आहे पण रंग नाही,
कृष्ण आहे पण देव नाही,
आड आहे पण पाणी नाही,
वाणी आहे पण दुकान नाही.
मी कोण आहे सांगा पाहू…

13) आपल्या डाव्या हातामध्ये आपण जे ठेवू शकतो
ते आपल्या उजव्या हातावर कधीही ठेवू शकत नाही.
ओळखा काय ते?

14) आपल्या सभोवताली आहे पण आपल्याला दिसत नाही, ती कोण ?

15) मी एका टेकडीच्या शिखरावर उभा राहिलो आणि दोन घरांच्या दरम्यान मोठ्याने घंटा वाजविले.
कोणते घर प्रथम घंटा ऐकेल?

16) ऑस्ट्रेलियाचा शोध लागण्यापूर्वी जगातले सर्वात मोठे बेट कोणते होते?

17) एका कैद्याला तीन खोल्यांपैकी एका खोलीमध्ये जाण्यास भाग पाडले जाते,
परंतु तो कोणत्या खोलीत येऊ शकतो?
पहिल्या खोलीत आग लागलेले आहे.
दुसरी खोली स्फोटक द्रव्याने भरलेले आहे जेणेकरून तो आत जाताक्षणी विस्फोट होण्याची दाट शक्यता आहे.
तिसऱ्या मध्ये एक सिंहाची जोडी आहे जे ३ वर्षांमध्ये काहीही खाल्ले नाही.
तर त्या कैद्याने कोणत्या खोलीत जाण्याचे निवडले पाहिजे?

18) एका अपार्टमेंट इमारतीच्या २५ व्या मजल्यावरील एक माणूस खिडकी स्वच्छ करीत आहे.
अचानक त्याचा तोल जातो आणि तो पडतो.
त्याला दुखापती पासून वाचविण्यासाठी सुरक्षिततेची कोणतीही साधने त्याच्याकडे नसते – पण त्याला दुखापत होत नाही.
हे कसे शक्य आहे?

19) एक माणूस चालत होता आणि पाऊस पडला.
त्याने छत्री आणली नाही किंवा टोपी घातली नाही.
त्याचे सर्व कपडे ओले झाले परंतु त्याच्या डोक्यावरचा एक केसही ओला झाला नाही.
हे कसे शक्य आहे?

20) एका नदीच्या मध्यभागी एक खांब उभा होता उभा होता त्याच्यावरती एक बल्ब होता तो सारखा विझायचा ! बंद व्हायचा ! विझायचा ! बंद व्हायचा ! तर त्याच्यासाठी विद्युत पुरवठा कोठून कोठून केला असेल?
 उत्तरे
1) उत्तर : 1 बैल ( एक मे या तारखेला विकला.)
2) उत्तर : जावई आणि सासू.
3) उत्तर : पीठ दळायची गरज नसते.
4) उत्तर : स्मशानभूमी मध्ये १०० लोक गेले की प्रेताला ठेऊन
              ९९ च परत येतात.
5) उत्तर : थंडी.
6) उत्तर : सीताराम.
7) उत्तर : अर्थातच दोन.
8) उत्तर : अभियंता त्या मुलाची आई आहे.
9) उत्तर : गुन्हा घडलेले घटनास्थळ कोठे आहे हे पोलिसांनी
               कधीही त्याला सांगितले नाही.
10)उत्तर : कोंबडा अंडी घालत नसतो, कोंबडी अंडी घालते.
11)उत्तर : सूर्यासारखा तेजस्वी.
12) उत्तर : लालकृष्ण अडवाणी.
13) उत्तर : आपला उजवा हात.
14) उत्तर : हवा.
15) उत्तर : दोन्ही घरे ऐकू शकत नाहीत, कारण घरांना कान
                 नसतात.
16) उत्तर : अर्थातच ऑस्ट्रेलिया, फक्त त्याचा शोध लागायचा
                 होता.
17) उत्तर :  तिसरी खोली – वर्षानुवर्षे काहीही न-खाल्लेले
                   कोणतेही सिंह, नक्कीच मृत असेल!
18) उत्तर : कारण तो इमारतीच्या आतून खिडक्या स्वच्छ करीत
                आहे.
19) उत्तर : तो माणूस टकला आहे.
20) उत्तर :  बल्ब कधी लागतच नव्हता .( विद्युत पुरवठा ची
                गरजच नाही.

टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

If you have any doubts, please let be know.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close