इ. १० वी निकाल / संकलन कोणत्या केंद्रांवर जमा करावी ? (शंका आणि त्याचे निरसन) | At which centers should SSC results be collected? (Doubt...
इ. १० वी निकाल / संकलन कोणत्या केंद्रांवर जमा करावी ? (शंका आणि त्याचे निरसन) | At which centers should SSC results be collected? (Doubt and its resolution)
काही सामान्य शंका आणि त्याचे निरसन पुढीलप्रमाणे...
01) सर्व परिशिष्ट एकाच पाकिटात द्यायची का ?
:--> वेगवेगळी परिशिष्टे यांची टॅग / पिन च्या साहाय्याने स्वतंत्र बांधणी करुन सर्व परिशिष्टे एकाच पाकिटात देण्यात यावी.
02) इयत्ता नववीच्या निकालासाठी पंजीतील संकलित निकालाची छायाप्रत आणि नववी च्या गुणपत्रिका द्यायच्या का ?
:--> सोबत इयत्ता नववीच्या निकालाची (एप्रिल 2020) पंजीमधील संकलित निकालाची प्रमाणित छायाप्रत देणे आवश्यक आहे. याशिवाय जे विद्यार्थी इतर शाळेमध्ये इयत्ता नववी उत्तीर्ण करुन आपल्या शाळेत दहावीला प्रवेशित झाले, त्यांच्या पुर्वीच्या शाळेतील निकालपत्राची (मार्कलिस्ट) छायाप्रत प्रमाणित करुन, त्यावर उजव्या बाजूला त्या विद्यार्थ्याचा SSC परीक्षेचा बैठक क्रमांक ठळकपणे लिहण्यात यावा.
03) प्रत्येक परिशिष्ट वर विषय शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची सही घ्यायची की समितीतील सर्व सदस्यांच्या सह्या घ्यायच्या?
:--> प्रत्येक परिशिष्ट वर विषय शिक्षक आणि मुख्याध्यापक यांची सही आवश्यक आहे. मूल्यमापन समितीच्या सह्या घेतल्यास काही हरकत नाही.
04) संकलित मूल्यमापन तक्ता (R1 ते R5 पैकी ) यामध्ये सर्व समीती सदस्यानी सह्या करायच्या का?
:--> या तक्त्यामध्ये खाली सर्व विषय शिक्षक , मुख्याध्यापक आणि मूल्यमापन समिती यांच्या स्वाक्षरीने सदर मूल्यमापन प्रमाणित करावे.
05) रिपीटर विद्यार्थ्यांची मागील वर्ग 10 अटेम्प्ट केल्याची गुणपत्रिका आणि त्याचीच वर्ग 9 वी ची गुणपत्रिका 2.01 परिशिष्ट सोबत जोडायची का?
:--> नाही. इयत्ता 10 वी च्या गुणपत्रिकेच्या छायाप्रती जोडण्याची आवश्यकता नाही. इयत्ता 09 वी ची गुणपत्रिकेची प्रमाणित छायाप्रत जोडावी.
06) एखादा विद्यार्थी इतर शाळेतून वर्ग 9 वी पास करुन 10 वी ला आपल्या शाळेत प्रवेशित असेल तर त्याची त्या शाळेतून प्राप्त गुणपत्रिका स्वतंत्र पाकीटात द्यायची का?
:--> नाही. परिशिष्ट सोबत जोडावी.
07) हमीपत्राचा जो नमूना PDF मधे दिला आहे तोच द्यायचा का?
:--> होय. परंतू जे लागू असेल त्याची नोंद घ्यावी.
08) काही परिशिष्ट आपल्याला लागू नाहीत ती ही द्यायची का?
--> नाही, काहीही गरज नाही.
09) सर्व मूल्यमापन साहित्य कोणत्या पाकिटात द्यायची आहे?
:--> मूल्यमापन संदर्भातील सर्व साहित्य बोर्डाकडून प्राप्त पाकिटामध्ये (अंतर्गत मूल्यमापन करिता मिळालेले) सिलबंद करुन , पाकिटावर school index no. , इतर माहिती व कव्हरिंग लेटर सह संकलन केंद्रावर नियोजित वेळेत जमा करावे.
10) काही शाळांना मूल्यमापन नोंदी ऑनलाइन करण्यास वेळ वाढवून पाहीजे , मिळेल का?
:--> हा शासनस्तरावरील प्रश्न अ ल्याने याबाबत काही सांगता येणार नाही.
COMMENTS