Thank A Teacher अभियानांतर्गत शिक्षक गौरव सप्ताह साजरा करणे
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शिक्षकाची अत्यंत महत्वाची भूमिका
असते. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव
केला जातो.
तसेच विद्यार्थी देखील शिक्षकांविषयीच्या
आपल्या भावना या दिवशी विविध उपक्रमांच्या माध्यमाद्वारे
व्यक्त करत असतात.
सद्यस्थितीत कोविड-१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व ठिकाणी शाळा
नियमितपणे सुरु करता आलेल्या नाहीत. तरी देखील
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु रहावे यासाठी
दुर्गम भागातील अनेक शिक्षकांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना
घरी जाऊन, समुह मार्गदर्शन वर्ग आयोजित करून विविध प्रकारे मार्गदर्शन
करून शेवटचा विद्यार्थी शिक्षण प्रवाहात राहण्यासाठी प्रयत्न केले आहे. विविध मार्गाने
विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि विद्यार्थी
शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी शिक्षक सातत्याने
प्रयत्न करत आहेत.
अशा सर्व शिक्षकांविषयी आदर व आभार व्यक्त करण्यासाठी शासनाने दि. ०२ सप्टेंबर २०२१ ते
०७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत Thank
A Teacher अभियानांतर्गत
शिक्षक गौरव सप्ताह साजरा करण्याचे ठरविले आहे.
राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी
मधील विद्यार्थ्यासाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम
आयोजित करण्यात यावेत. या कालावधीमध्ये शालेय स्तरावर निबंध
लेखन,
काव्य वाचन, काव्य लेखन, चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे ऑनलाईन/ऑफलाईन
स्वरुपात आयोजन करावे.
तसेच शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात
यावा. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक,
लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग
घेण्यात यावा.
यामधील सर्वोत्तम असलेल्या कार्यक्रमापैकी “राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद" महाराष्ट्र्
(SCERT) जिल्हानिहाय व
गटनिहाय तीन सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांची निवड करतील.
कोरोनाची परिस्थिती सामान्य झाल्यानंतर सदर विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन
यथोचित गौरव करण्यात येईल.
सदर कार्यक्रमांचे आयोजन करत असताना कोविड-१९ च्या प्रादुर्भावाच्या
पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन
करण्याची दक्षता घ्यावी.
TAG- thank a teacher quotes,thank a teacher message,thank a teacher day 2021,thank a teacher day,thank a teacher day 2022,thank a teacher note,thank you as a teacher,thank a teacher day 2021 resources,thank a teacher during pandemic,thank a teacher from parent,thank a teacher gift
If you have any doubts, please let be know.