महाराष्ट्रातील सर्व शाळा १ डिसेंबर २०२१ पासून सुरु - शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

0 Mr. Annasaheb Babar

महाराष्ट्रातील सर्व शाळा १ डिसेंबर २०२१ पासून सुरु | All schools in Maharashtra starting from 1st December 2021

महाराष्ट्रातील सर्व शाळा १ डिसेंबर २०२१ पासून सुरु | All schools in Maharashtra starting from 1st December 2021

      कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती असल्याने आपल्याकडे शाळा सुरू होतील की नाही याची सर्वांना शंका होती. परंतु शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज 1 डिसेंबर 2021 पासून सर्व शाळा सुरू होतील अशी घोषणा केली आहे. त्यामुळे आता सर्व चर्चांना पूर्ण विराम विराम मिळालेला आहे.

शाळा सुरू करण्याचे कारण:-

      मा. वर्षा गायकवाड यांनी कोरोनाचा धोका असतानाही मुलांना शाळेत येण्याची जोखीम का घेतली याचे कारण सांगितले. मागील दोन वर्षापासून मुले शाळेमध्ये आली नाहीत त्यामुळे मुले शाळेपासून दुरावलेली आहेत त्यांना प्रवाहात आणणे गरजेचे आहे असे तज्ञांनी मत व्यक्त केले आहेत. त्यामुळे पहिली ते दहावी या सर्व शाळा सुरू करण्याचा मोठा निर्णय आज राज्य शासनाने जाहीर केला आहे.

शाळेमध्ये मुलांची काळजी कशी घ्यावी?

      महाराष्ट्रातील आठवीच्या पुढील वर्गातील सर्व शाळा सुरू झालेल्या आहेत परंतु आता सर्व शाळा सुरू होत असल्याने पहिली ते चौथीच्या वर्गातील मुलांची काळजी घेणे गरजेचे आहे असे मत पालकांमधून येत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पालकांचे व मुलांचे योग्य समुपदेशन केले जाईल. तसेच पालकांनी मुलांना बाहेर पडल्यानंतर व शाळेमध्ये स्वतःची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती देणे गरजेचे आहे असे शालेय शिक्षण मंत्री यांनी सांगितले.

वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण नोंदणी 2022(Click Here)

विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस सुरू होणार का?

     शाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्कूलबस सुरू करावी की नाही यासंबंधी निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. शक्यतो पालकांनी मुलांना स्वतःच्या वाहनाने शाळेत पोहोचविणे सोयीचे ठरेल असे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. तसेच बस मध्ये बसण्यास संबंधी वर्गामध्ये बसण्या संबंधी व शाळेच्या आवारात वावरणे यासंबंधी आठ दिवसांमध्ये नियमावली जारी केली जाईल असेही मत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले.

Tag-school start date 2021,school starting,school starting date,school starts in maharashtra,school starting date in maharashtra,school starting in pune,school start date 2021 in maharashtra,school start news,school start in maharashtra,school start in mumbai,school start date,start in maharashtra 2021,school start in pune,school start age india,school start and end dates,school start after lockdown,school start age

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Out
Ok, Go it!
close